अर्जाची छाननी न करता घेतली शिपाई पदाची परिक्षा

पु‍यारदंड ग्राम पंचायतीच्या ग्रामसचिवाचा प्रताप , ग्रा.प.सदस्याची दिशाभुल

चंद्रपूर : -  पं.स. चिमुर अंतर्गत पुयारदंड ग्रा.पंचायतीमधे शिपाई पदासाठी मागवलेल्या अर्जाची छाननी न करता सरसकट सर्व अर्जदाराला परिक्षेला बसवून परिक्षा घेण्याचा प्रताप ग्रामसेवक प्रतिभा कन्हाके यांचेकडून २५ मार्च रोजी घडून आला .
             ग्रा.प.पुयारदंड येथील शिपाई पद ऑगस्ट २०१९ पासुन रिक्त झाले .नविन पदाची भरती होईपर्यत जुनाच शिपाई धनराज कन्हाके यांना रोजंदारानी ग्रा.प. शिपाई या कामासाठी ठेवण्यात आले . परतू या वर्षी झालेल्या पंचवार्षिक निवडणूकी नंतर ग्राम प्रशासनाने शिपाई पदभरती घेण्याचे ठरविले . त्यासाठी ग्रामसचिव प्रतिभा कन्हाके यांनी शासन परिपत्रकानुसार व मासिक सभा घेवून नियम ,पात्रता व अटि नुसार पदभरती साठी अर्ज मागविण्यासाठी जाहीर नोटीस काढून ग्रावातील सुशिक्षित युवक व युवती कडून अर्ज मागविले .
जाहीर नोटीस नुसार २० मार्च पर्यत गावातील व्यकीचे अर्ज ग्रामपंचायतीला प्राप्त झाले .
        
      जाहीर नोटीसमधे नमूद अटि , पात्रता यानुसार प्राप्त अर्जाची छाटनी करुण उर्वरित पात्र अर्जदारालापरिक्षेला बसविने हा स्पर्धा परिक्षा  आयोगाचा नियम असतो परतू ग्रामसचिव प्रतिभा कन्हाके यांनी या नियमाचे उल्लंघन केले . 

       जाहीर नोटिस मध्ये वयोगट 
खुला प्रवर्ग  - १८ ते २५ तर मागासवर्ग व इतर मागास वर्ग १८ ते ३५ वर्ष . असे नमूद असतानी ३५ वर्षा पेक्षा जास्त वय असलेल्या अर्जदारानी छाननी न झाल्यामुळे शिपाई पद भरती ची परिक्षा दिली . २५ मार्च २० २१ रोजी परिक्षा घेण्यात आली .   

       परिक्षा होण्या अगोदर अर्जाची छाननी का केली नाही या संदर्भात सरपंच व इतर सदस्य यांनी विचारना केली असता आपल्या ला अर्जादाराची छाननी पेपर झाल्या नंतर मिळालेल्या गुण क्रमांकानुसार करता येते असे सांगूण सरपंच व ग्राम सदस्य याची दिशाभुल केली.

     परिक्षा झाल्यानतर अटि व पात्रतेनुसार अर्जाची छाननी न करता परिक्षा घेतली हे माहित होताच या परिक्षा प्रकियेवर गावात चित्र विचेत्र चर्चेला उधान आलेला आहे .

         परिक्षा केंद्रावर सरपंच बेबीताई पारधी ,सर्व ग्राम सदस्य ,ग्रामसचिव प्रतिभा कन्हाके व पर्यवेक्षक म्हणून आनंद गलबले परिक्षा केंद्रावर उपस्थित होते .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!