वाढोणा येथे रक्तदान शिबीर संपन्न 42 युवकांनी केले रक्तदान
तळोधी ( बा.)(यश कायरकर)
नागभिड तालुक्यातील वाढोणा येथे ग्राम पंचायत वाढोणा व दगदंब युवा ग्रुप वाढोणा यांचे संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर संपन्न झाले.
कोरोना चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देशात रक्ताचा तुटवडा जानवत आहे अशातच आता शासनाने 18 ते 44 वयोगटातील कोविड लसिकरण सुरु केल्याने साधारणतः 6 महिने पर्यत रक्ताचा फार मोठा तुटवडा भासणार आहे हे लक्षात घेता व आपल्या भागातील लोकांना रक्ताची गरज भासल्यास ते मिळवुन देता यावे या उद्देशाने रक्तदान शिबिराचे आयोजित करण्यात आले होते.
रक्तदान शिबीराची सुरुवात छञपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार व दिपप्रज्वलन करुन करण्यात आली या वेळी. श्री. देवेंद्र प्रेमदास गेडाम सरपंच ग्रा.प.वाढोणा, श्री. डाँ. राहुल डोर्लीकर प्राथमिक आरोग्य केन्द्र वाढोणा, श्री. भगवाण बन्सोड उपसरपंच वाढोणा, श्री. रुपेश डोर्लीकर, श्री. अनिल डोर्लीकर सदस्य ग्रा. प. वाढोणा, श्री. राहुल मरस्कोल्हे अध्यक्ष जगदंब युवा ग्रुप वाढोणा आदी मान्यवर उपस्थित होते...
रक्तदात्याना ग्राम पंचायत वाढोणा व जगदंब युवा ग्रुप वाढोणा कडुन प्रमाणपञ, फळे, ड्रायफुड्स देवुन विशेष आभार मानले.
या शिबिराच्या यशस्वीतेसाठी विशेष करुन श्री. पराशर पगाडे, श्री. समिर सुर्यवंशी, श्री. विजय काळेवार गुरुदास पुस्तोडे,व सर्व ग्राम पंचायत कर्मचारी यांनी अथक परिक्षम घेतले,



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!