जंगलातील वनव्यामुळे अपघाताचा धोका
जंगलातील वनव्यामुळे अपघाताचा धोका
काही ठिकाणी रस्त्यावर झाडे पडल्याने वाहन चालवने अवघड
जितेंद्र पेंदाम पवनपार प्रतिनिधि
सिंदेवाही तालुक्यातील बहुतांशी जंगलात आगीचे तांडव बघायला मिळाले.जंगलात आग लावल्या गेली असा संशय नागरिकांकडून ऐकायला मिळत आहे.
आग कशीही लागली असली तरी नुक़सान जंगलाचीच झाली.
जंगल जळाल्यास तेंदुपत्याची पाने चांगली येत असतात .त्यामुळे जंगलाला आग लावली जाते.असे नागरीकांत चर्चिल्या जात आहे.
परन्तु या आगीने वन्यजीवांची हाणी होत आहे.
जंगलात वनवा लागल्याने अनेक झाडे जळाली.रस्त्यालगतच्या झाडे जळाल्याने जळालेली झाडे केव्हा कोसळतील याचा नेम उरला नाही .त्यामुळे अपघाताचा धोका निर्मान झाला आहे.
अशा प्रकारची घटना सिंदेवाही तालुक्यातील खैरी ते पवनपार रस्त्यावर घडली.खैरी तलावाजवळ चडावरती झाड जळाल्याने रस्त्यावरच झाड कोसळला.प्रवासी थोडक्यात वाचले.असे नागरीकाकडून कळते.
आता ते झाड रस्त्याच्या मध्येच पडल्याने रात्रोला वाहन चालवित असतांना अपघाताच धोका निर्मान झाला आहे.
संबंधित विभागाने ते झाड बाजुला करावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!