सुघंनधीत तंबाखू विक्रेता मनोहरभाई पटेल अखेर LCB च्या जाळ्यात

१ लाख ५५ हजार ४०० रुपयांचा माझा ( सुगंधित तंबाखू जप्त )
गेल्या अनेक वर्षांपासून चिमूर शहरातुनच होत होती तंबाखू जन्य पदार्थाची तस्करी व  विक्री

तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - दिनांक.०६/०२/२०२१ तंबाखूजन्य पदार्थांवर शासनाने बंदी घातली असून सुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून मनोहरभाई पटेल हा चिमूर शहरातील नामवंत   व्यावसायिक किराणा दुकानाच्या नावा खाली गेल्या अनेक वर्षांपासून  खुलेआम तंबाखूजन्य पध्दार्थ विकत असून यांच्यावर अनेक वेळा कारवाही होऊन सुद्धा सुगधंधित तंबाखूची मोठ्या प्रमाणात विक्री सुरूच असते.हा सर्व प्रकार किराणा दुकानाच्या आड सुरु असून गोपनीय माहितीच्या आधारावर  मनोहरभाई पटेल यांच्या राहत्या घरी टिळक वार्ड येथे LCB ने छापा टाकून कारवाई केली.
(१) किंमत ३३,८००/- बाबा जर्दा तंबाकुचे एकुन १३ खरड्या च्या खोक्यात प्रत्येकी २० ग्राम ने भरलेले प्रती नग २६०/- या प्रमाणे एकुन १३० पॉकिट
(२) किंमत १९०००/- मजा १०८ तंबाखूचे एकुन १९ डब्बे प्रत्येकी २०० ग्राम ने भरलेले प्रती नग १००० /- (३) किंमत १६०००/- मजा १०८ तंबाखू चे एकुन ८० डब्बे प्रत्येकी ५० ग्राम ने भरलेले प्रती नग २००/- (४) किंमत २०००/- मजा १०८ तंबाकु चे एकुन ०२ पाकीट डब्बे प्रत्येकी २०० ग्राम ने भरलेले प्रती नग १००० /- (५) किंमत ३०००/- इगल तंबाकु ४० ग्राम चे ५० पाकीट प्रती नग ६०/- (६) किंमत ३,९००/- इगल तंबाकु २०० ग्राम चे १३ पाकीट प्रती नग ३०० /- (७) किंमत ४८,७५०/- एम.एच. रॉयल जाफरानी जर्दा चे ६५ खोके प्रती नग ७५० /- (८) किंमत २२,९५० /- रजनिगंधा छोटा पाकीट ८५ खोके प्रती नग २७०/- (९) किंमत ६०००/- रजनिगंधा २० डब्बे प्रत्येकी १०० ग्राम ने भरलेले प्रती नग ३००/- असा एकुन १५५४००/- चा माल यांच्या रहाते घरून जप्त केला. आरोपी नामे मनोहरभाई पटेल वय ७२ वर्ष धंदा किराणा दुकान रा.टिळक वार्ड चिमुर यांचेवर कलम ३२८, १८८,२६९,२७३ भादवी सहकलम ५९ (iii) अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६  त्या अर्तगत नियम व नियमाने २०११ चे कलम २६(२)(i), २६(२) (vi) ,२७ (३)(d),२७(३) (e) सहकलम साथी चे रोग प्रतिबंधक अधिनीयम सन १८९७ चे कलम २,३,४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आली. तंबाकू विक्री करणाऱ्या मनोहरभाई पटेल यांच्यावर झालेल्या या पोलीस कारवाही मुळे चिमूर तालुक्यातील तंबाखू विक्री करणाऱ्या लहान तसेच मोठया व्यावसायिकाचे धाबे दणाणले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!