राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने रस्ता रोको आंदोलन

तालुका - प्रतिनिधी ( आलेख रट्टे )

वरोरा : - देशात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी व केन्द्रसरकारने शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यात यावे यासाठी  आज सकाळी 11.00 वाजता  "रस्ता रोको आंदोलन " राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आनंदवन चौक  ,नँशनल हायवेवर काही वेळापुरता बंद पाडला व नागपूर चंद्रपूर महामार्गावर रस्ता रोको आंदोलन सुरू केले त्यामुळे येणारी जाणारी वाहतूक काही काळासाठी स्थगित झाली होती . केंद्र सरकारच्या या धोरणाचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाची भूमिका घेतल्याने पोलीस प्रशासनाची तारांबळ उडाली .यानंतर लगेच पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना नजरकैदेत घेत पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले. या नंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू करण्यात आली. चक्काजाम आंदोलनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे मा मोरेश्वर टेमुर्डे साहेब ,   विधानसभा अध्यक्ष विलास नेरकर, तालुका अध्यक्ष विशाल पारखी , बंडूची डाखरे, दिनेश मोहारे, जयंत टेमुर्डे , हसन दोसानी, बंडूजी खारकर, चंद्रकांत कुंभारे, राजू वरघने,अविनाश ढेंगडे ,  प्रदिप बुराण , नगाजी निंबालकर ,  अशोक पोफडे ,  बंडू भोगाडे, अतुल वानखेडे, तुलसी अलाम , विजय धंदरे , देविदास धोटे ,  विजय तेलंग ,  दिलीप महल्ले , मुजमील शेख , अरुण सहारे , सुधाकर उपरे , पांडुरंग वैद्य ,  छबिया देवगडे, रंजना पारशीवे ,सुशीला तेलमोरे , दिलीप खैरे,आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!