नवतळा येथील घर आगीत जळून भस्म अन्न धान्य वस्त्र घरगुती वापराचे सामान धान पैसे आगीत जळून खाक
शंकरपुर (जगदिश पेंदाम)
चिमूर तालुक्यातील नेरीवरून जवळ असलेल्या नवतळा येथील वत्सला पतरु शेंडे यांचे घर आज दि 3 वाजता अचानक लागलेल्या आगीत जळून भस्म झाले यात फक्त घराच्या भीती उरल्या असून सर्व सामान आगीत जळून खाक झाले आहे या आगीत अन्न धान्य वस्त्र घरगुती वापराचे संपुर्ण वस्तु धान्याचे उपजीविका साठी ठेवलेले 10 पोते आणि पेठीत ठेवलेले काही रुपये जळून खाक झाले त्यामुळे वत्सला बाई उघड्यावर आल्या असून काळाने त्यांच्यावर घाला घालून त्यांच्या कडून अन्न वस्त्र निवारा हिसकावून नेला आहे त्यामुळे त्यांच्यावर आस्मानी संकट कोसळले आहे...
सुदैवाने यावेळेस घरात कोणीही नव्हते आग हळूहळू लागली जेव्हा आगीचा भडका झाला आणि धुराचा लोट निघू लागला तेव्हा घराजवळील व चौकातील लोकांना माहिती झाली तेव्हा कशाची तमा न बाळगता नागरिक आग विजवण्यासाठी धावू लागले ज्यांच्या हातात जे साहित्य मिडेल त्याने पाणी आणून आग विजवण्यासाठी शर्तीचे प्रयन्त करीत होते सर्व नागरिक महिला पुरुष जीवाचे रान करून पाणी आणीत होते आणि सगळीकडे आग आग म्हणून एकच बोबाबोब सुरू होती नागरिकांच्या अथक प्रयत्नानंतर आग कशी तरी आटोक्यात आली घराचा एक भाग जळून खाक झाला तर दुसरा वरतून जळून खाक झाल्या पण भिंती उरल्या आणि या भागात गॅस हंडे भरले होते जर आग त्यांना लागली असती तर स्फोट होऊन संपुर्ण गाव आगीच्या कवेत आला असता कारण गाव हे दाट वस्तीचे होते
आग लागताच गावातील माजी सरपंच महादेव कोकोडे यांनी चिमूर नगरपरिषदेतील अग्निशमन दलाला माहिती दिली तसेच तलाठी याना पंचनामा करण्यासाठी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधला आणि प्रशासकीय यंत्रणेला माहिती दिली ही आग कशानी लागली याचे कारण मात्र कळू शकते नाही परंतु या आगीमुळे वत्सला बाईवर संकट कोसळेले आहे त्यामुळे शासनाने या गंभीर बाबीची दखल घेऊन वत्सला बाईला घर उपलब्ध करून घ्यावा व अन्न वस्त्र निवारा आणि आर्थिक मदत करावी अशी महादेव कोकोडे व ग्रामवाशीय नागरिकांनी मागणी केली आहे..



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!