मूल परिसरात मजुरांवर बेरोजगारी : रेती घाट अजूनही प्रक्रियेच्या प्रतीक्षेत
मूल : (मंगला बोरकुटे)
परिसरात रेती अभावी बांधकाम व्यवसाय ठप्प पडत आहेत. बेरोजगारीमुळे शेकडो बांधकाम मजूर व त्यांचे कुटुंबावर उपासमारीचे संकट ओढवले आहे. रेती घाटाचे लिलाव होण्यास उशिर होत असल्याने करावे तरी काय,असा प्रश्न निर्माण झाला आहे.
उमा नदी मूल परिसरात आकापूर,महेगाव,चिचाळा,चक देहगाव,नलेश्वर,सुशी दाबगाव,बोरचांदली,उश्राळा चक,राजोली,चितेगाव,येरगाव,भेजगाव रेती घाट असले तरी त्या घाटाचा शासनाने लिलाव केला नाही.रेती घाट अजुनही प्रक्रियेच्या प्रतिक्षेत आहे.सध्या प्रशासन च्या सक्रियतेमुळे मोठया तस्करीला पायबंद लागला आहे. तरी परीसरातील रेतीचा चोरटा व्यापार काही प्रमाणात सुरू असताना सुध्दा रेतीचे दर गगणाला भिडले आहेत. 600 रूपयांना मिळणारी रेती आता 2,000 रूपयांवर पेाहचली आहे. त्यातही अॅडव्हॉंस पेमेंट घेण्याचे प्रमाण अधिक आहे.तरीही भसका रेतीने ग्राहक त्रस्त आहेत.
सन 2021 वर्षातील फेब्रवारी महिना अर्धा उलटून गेलेला आहे. शासकीय स्तरावर त्वरित लिलावाची कार्यवाही सुरू केली तरी साधारणत दोन महिन्याचा कालावधी प्रत्यक्ष रेती उपलब्ध होण्यासाठी लागणार आहे. पंरतू नोव्हेबरपासून सामान्य नागरिकांना कुठेही रेती उपलब्ध होताना दिसत नाही. शहरातील व्यापारी,बिल्डर यांच्या कामाच्या ठिकाणी रात्रीच्या अंधारात रेती ठिकाणी माफिया भरमसाठ पैसे उकडून रेती विक्री करत असल्याचेही नाकारता येणार नाही. यामध्ये मोजक्याच मजुरांना रोजगार उपलब्ध होत आहे. त्यामुळे आता रेती अभावी आता सामाजिक समस्या निर्माण हेाऊ पाहत आहेत.स्वप्रातील घरे आकारास येण्यापूर्वीच अनेकांना नैराश्याने ग्रासले आहे. आपले घर साकारणार तरी केव्हा,असा प्रश्न सर्वसामान्य विचारू लागले आहेत.
मजुराना रोजगार उपलब्ध हेात नसल्याने त्यांच्या कुटुंबाचा भरणापोषणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. सामाजिक संस्था,संघटना तसेच लोकप्रतिनिधींनी याकडे गांभियाने लक्ष घालून तळागाळातील मजुरांना न्याय देणे गरजेचे झाले आहे.
प्रधानमंत्री आवास योजना प्रभावीत
प्रत्येक नागरिकाला हक्काचे घर मिळावे. याकरिता केंद्र शासनाने पंतप्रधान आवास योजना अंमलात आणली. परंतू अजूनही मंजूर झालेल्या घरकुलापैकी 50 टक्के घरकुल रेती अभावी उभे झालेच नाहीत. सुरू असलेली कामेही प्रभावीत झाली आहेत. बरीचशाी कामे थंडवस्तात आहेत.रेती लिलाव न झाल्यामुळे हक्काचे घर रखडलेले तर दुसरीकडे बेरोजगारमुळे मजुराची उपासमारी होत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!