किशोर कवठे आचार्य पदवीने सन्मानित
तालुका - प्रतिनिधी ( रोशन येवले )
राजुरा : - साहित्य क्षेत्रात स्वतःचे अढळ स्थान निर्माण करणारे संवेदनशील कवी, स्तंभलेखक किशोर कवठे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ,नागपूर येथून मराठी विषयात 'साहित्यिक ना.गो. थुटे यांच्या समग्र साहित्याचा चिकित्सक अभ्यास' या विषयावर आचार्य पदवी संपादन केली आहे. त्यांनी सदर संशोधन कार्य प्रा. डॉ. रवी केवट, मराठी विभाग प्रमुख, महिला महाविद्यालय, बल्लारपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले. किशोर कवठे सध्या शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, देवाडा येथे माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
कवी किशोर कवठे यांचे पसरत गेलेली शाई, गावसूक्त, दगान काव्यसंग्रह प्रकाशित असून 'ऐसा चेतला अभंग' ग्रंथ संपादित केला आहे. अनेक राज्यस्तरीय साहित्य संमेलनात निमंत्रित कवी म्हणून सहभाग तथा विविध सामाजिक उपक्रमांत त्यांचा हिरेरीने सहभाग असतो. त्यांच्या साहित्य कृतींना राज्यस्तरावर अनेक वाङ्मयीन पुरस्कार प्राप्त झाले आहेत. संशोधित यशाबद्दल अक्षर साहित्य व कला प्रतिष्ठान, सप्तरंग संस्था, नाते आपुलकीचे आदी संस्थांनी शुभेच्छा दिल्या आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!