सक्षगंध नंतर चक्क वधुनी गाठले वराचे घर आणि तंटा मुक्त समिती समोर उरकले लग्न


पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे  )

पळसगाव पिपर्डा : -  चिमूर तालुक्यातील पळसगांव (पि)येथील तंटामुक्त समितीच्या  माध्यमातून स्वजातीय युगलाचा विवाह तंटामुक्त समितीच्या उपस्थिती आज दिनांक ४/२/२०२१ ला पळसगांव येथील भूषण वामन मेश्राम वय २५ वर्ष या मुलाचे जाति रिवाजनुसार साक्षगन्ध डिसेंम्बर महिन्यात रुपाली जालिंद्र खोब्रागडे मु मुंडळा पोस्ट पेंढारी तालुका सावली जिल्हा चंद्रपुर येथील वय २२ वर्ष या मुलीसोबत २७ डिसेंम्बर २०२० ला सावली मुकामी पार पाडण्यात आले होते.मात्र मुलीच्या मनात लग्ना बद्दल विचारा मध्ये बदल पडत असल्यामुळे मुलीने थेट मुलाचे गावी पळसगांव तालुका चिमूर जिल्हा चंद्रपुर येथे आज युगलाने लग्न करण्याचे ठरविले. त्यानुसार त्यांनी तंटा मुक्त समिती पळसगांव येथील तंटामुक्त समिती अध्यक्ष कु. सचिन बन्सोड व पोलीस पाटील रागिना दडमल व समिती यांच्याकडे लग्न लावून देण्यास विनंती अर्ज सादर करुन वयाचे कागदपत्रे सादर केले त्यानुसार दोघेही लग्नायोग्य असून वयाने पूर्ण झाल्याची खात्री झाल्यानंतर त्यांचे लग्न नालंदा बौद्ध विहार पळसगांव  येथे सायकाळी ०७:४५ वाजता गावकऱ्यांच्या उपस्थितीत नरेश पाटील यांनी बौद्ध धर्माच्या रितिरिवाजानुसार लग्न लावण्यात आले. यावेळी गावकयांनी नविन जोडप्याला भरभरून आशिर्वाद दिला. यावेळी सचिन बन्सोड तंटा मुक्त समिती अद्यक्ष,रागिना दडमल  पोलिस पाटील,संजय सोनेकर,प्रभाकर गजभिये,हाफिज शेख,सुरेश शेंडे,तुळशीदास शेरकुरे,वसंता बन्सोड,प्रमोद मेश्राम,मंगला सोनवणे,कृष्णा पाटील,भिसमचार्य राऊत ,रोशन भोले, प्रज्वल लोणारकर व आदि गावकरी यावेळी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!