बामनवाडा येथील व्यायाम शाळा सुरू करा अभिलाष परचाके यांनी केली निवेदनातून मागणी
तालुका - प्रतिनिधी ( रोशन येवले )
राजुरा : - बामनवाडा येथे व्यायाम शाळा असून या व्यायाम शाळेत गावातील युवक कसरत करून आरोग्य सुदृढ करीत आहेत.
कोरोना विषाणू च्या वाढत्या प्रकोपाणे गावातील व्यायाम शाळा बंद करण्यात आल्या होत्या.
कोरोना विषाणूची तीव्रता कमी झाली असून या विषाणूचा नायनाट करण्यासाठी आरोग्य सुदृढ करणे गरजेचे असून ही बाब लक्षात घेऊन बिरसा क्रांती दल चे उपाध्यक्ष अभिलाष परचाके यांनी गावातील व्यायाम शाळा सुरू करण्याची मागणी निवेदनातून केली आहे.
परचाके यांनी गावातील युवकांचे आरोग्य सुदृढ राहावे व निरोगी राहावे तसेच आरोग्यावर खर्च कमी व्हावा यासाठी व्यायाम शाळा सुरू करणे गरजेचे आहे असे प्रामुख्याने निवेदनात नमूद केले आहे.
निवेदन ग्रामपंचायत हे ग्रामसेवक कवठालकर यांनी स्वीकारले असून यावेळी सहकारी मित्र अनिकेत नगराळे, संदेश वाघमारे, रोहित नगराळे उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!