तालुक्यातील भातगिर्णीचे प्रदुषण रोखण्यात यावे-मनसे नागभीड ची मागणी
तळोधी(बा.) (यश कायरकर)
नागभीड तालुक्यात , शहरा अंतर्गत तथा तळोधी परिसरात भात उत्पन बऱ्याच पैकी होते त्या पिकांचे अवचित्य साधुन बऱ्याच व्यवसायंकानी शहरात तथा शहरा लगत आप आपल्या भात गिर्णा उभारल्या,ज्या वेळी भात गिर्णाची निर्मिती झाली त्या वेळची परिस्थिति काही वेगळीच होतीआता कालांन्तराने ही परिस्थिती बदलत चालली गावाचे रुपांतर हे शहरी भागात होत आहे दिवसान दिवस मानवी विकास होत आहे ,लोक वस्ती वाढत आहे, दळणवळणाच्या सुविधा दुप्पटीने वाढत आहे, आणि आजची परिस्थिति पहिल्या पेक्षा अधिक प्रगतशील होत आहे ,परंतु या भात गिर्णा ज्या परिस्थित आहे त्यात काहिचा बद्दल पडलेला नाही याचाच परिणाम आता उग्र रुप घेताना दिसत आहे, गिर्णा भवताल शाळा,खाजगी दवाखाने,हाटेल,व अन्य शासकीय कार्यालये आहेत,सद्या धानपिसाईचे काम अतिशय जोरात सुरु आहे या धान दळणे वेळी धानाच्या गिरणीमधुन धानाचे सुक्ष्मकण ,भुसा बऱ्याच प्रमाणात बाहेर पडुण तो वाऱ्यामध्ये पसरुण संपुर्ण शहरामधील परिसरामध्ये धुक्या सारखे पसरताना दिसतात त्यामुळे या परिसरामध्ये राहणारे नागरीक या प्रदुषणामुळे गंभीर आजारी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सावरगाव येथील भात गिरनी च्या होनार्या प्रदुषण मुळे या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.व नागरिकांना त्वचाविकार होऊन आर्थिक व शारीरिक त्रास सहन करावा लागतो आहे. त्याबध्दल ही योग्य ती कारवाई करून ही भातगिरनी सुध्दा गावाला बाहेर हलवावी असी मागनी सुध्दा या सावरगाव भात गिरनी परिसरातील नागरिकांनी यापूर्वी बरेच दा केलेली आहे. अशा प्रकारे या बाबत तक्रार करुण सुध्दा यावर कोणताही तोडगा निघला नाही ,अखेर याच परिसरातील नागरिकांनी महाराष्ट्र नवनिर्मान सेना, यानां निवेदन देऊन या भात गिर्णिमुळे होणाऱ्या प्रदुषणाला आळा घालण्याची केली याच जनतेच्या मागणिला लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे शहर अध्यक्ष, सुधिर राजगडकर यांनी नगरपरिषदेच्या सिईआओ श्री चव्हान साहेब यांना निवेदन दिले या वेळी चव्हान साहेबानी संपुर्ण मिल धारकांना वाढत्या प्रदुषना आळा घालण्याचे नोटीस देण्याचे आश्वासन दिले ,या वेळी अरुण बोकडे, शुशांत कोवे,निलेश बागडे,संजय मसराम,शेखर अमृतकर,पुडंलीक ठाकरे तथा अनेक मनसैनिक उपस्थीत होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!