बोडधा नदी लगतचा रेती साठा लिलावाच्या नावावर होत आहे नदी पात्रातील रेतीची तस्करी
महसूल अधिकारी झोपेत
तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )
चिमूर : - चिमुर तालुक्यातील मौजा बोडधा नदी लगतचा रेती साठा लिलाव करण्यात आला आणि तो लिलाव झालेला रेती साठा फक्त दिखावा म्हणून आहे. त्यापेक्षा २० पटीने अवैधरीत्या रेती ठेकेदार हे नदी पात्रातुन पोकलँड द्वारे रेतीचा उपसा करून रात्रभर १० चाकी आणि १२ चाकी हायवा ने रेतीची अनधिकृतपणे चिमूर तहसील व उप विभागीय अधिकारी कार्यालयाच्या समोरून खुलेआम चंद्रपूर,वरोरा,नागपूर,हिंगणघाट, वर्धा या शहरांच्या ठिकाणी रेतीची वाहतूक तस्करी करीत आहे. आणि यामुळे मोठ्या प्रमानात साधनाचा महसूल बुडत आहे. तसेच या नदी पात्रातुन पोकलँड द्वारे रात्रोला रेतीची तस्करी होत आहे.यांना पुर्ण पणे सहकार्य महसुल विभागाचा मिळत आहे.मांगील काही महिन्यांच्या अगोदर मोटेगाव येथील उमा नदी पात्रातून रेती साठा सिस्थ पने लीलाव करण्यात आला. त्याच पद्धतीने बोदडा नदी रेती साठ्याचा लिलाव करण्यात आली.तेच ठेकेदार या लीलाव्यात सहभागी असल्याचे कळते.हे ठेकेदार आमदार व खासदार च्या जवळचे असल्याचे समजते. म्हणूनच या परीसरात मोठ्या प्रमानात रेती,मुरमाचे अवैध धंदे खुले आम पने चालू आहे.महसुल विभागाचा मोठा वाटा असल्याचे यावरुन कळते.कारण जेव्हा लीलाव करतात तेव्हा रेती साठा हा कमी असतो पण जास्त ब्रास अधिकाऱ्यांना दाखवीत असतात व लिलाव प्रक्रिया करीत असतात. लिलावात माहागळी बोली लावूग हे रेती माफीया रेती साठयाचा लिलाव घेत असतात.नंतर हे ठेकेदार त्याच रेती साठयाचा पंचनामा करून अधिकाऱ्याला देखरेख करीता ठेवत असतात.रेती या ठिकानावरून नेली नाही.अश्या प्रकारे सांगण्यात येते पण रात्रोला पुर्ण पणे रेतीचा काळा बाजार चालत असतो. नदी पात्रातुन अवैध रेती पोकलॉन द्वारे काढत असतात.ट्रक द्वारे बाहेर रेती मोठ्या प्रमाणात पाठवीत असतात.अधिकारी फक्त दिखावा आणि चौकशी करत असतात,फक्त जनतेचा किंवा तक्रारदार करणाऱ्या चे समाधान करून जात असतात. सामोर ची सुचना वरीष्ठ अधिकाऱ्याना देण्यात येणार आहे.वरीष्ठ अधिकारी हे मिळून असतात म्हणूनच सुचना देऊन सुध्दा तात्काल कार्यवाही करीत नसतात. यामुळेच तस्कराची हिम्मत वाठत असते व मुजोरी आणि गुंडेगिरी करीत असतात.त्या मुळे प्रत्येक ठिकानी हमले किंवा खुना चे प्रकार होत असतात.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!