लाखांदुर येथे तालुका बैठकी मध्ये वंचित बहुजन युवा आघाडीची कार्य कारिणी घोषित

जिल्हा - प्रतिनिधी ( प्रकाश नाकतोडे )

भंडारा : - लाखांदूर येथील तरूण वर्गाला चांगल्या मार्गावर आणण्यासाठी वंचित बहुजन युवा आघाडी लाखांदुरच्या वतीने बैठक पार पडली बैठकी मध्ये मार्गदर्शन करण्यात आले आजचा युवा व्यसनाधीनतेकडे जात असून त्याला योग्य मार्गाची गरज आहे.असे प्रतिपादन सिलमंजु सिव्हगडे जिल्हा प्रवक्ता  यांनी व्यक्त केले. तालुक्यातील प्रश्न आपण लवकरच मार्गी लावु असेही म्हणाले. मग शेतकर्यांचे प्रश्न असो वा ओबीसी जातीनिहाय जनगणना असो या सर्व प्रश्नांचा आपण लवकरच विचार करून योग्य ती अंमलबजावणी करू असेही म्हणाले. वंचित म्हणजे शोषित, पिडीत समाजाला न्याय कसं मिळवून देता येईल या उद्देशाने वंचित बहुजन युवा आघाडीची कार्यकारिणी घोषित करण्यात आली. आजच्या काळातील युवा हा बेरोजगार आहे. त्याला पुढे नेण्यासाठी आपल्याला काय-काय करता येईल यांवर सुद्धा विचार मांडण्यात आले. या बैठकी सबंधाने तालुका अध्यक्ष प्रकाश नाकतोडे यांनी लाखांदुर तालुक्यातील अनेक समस्याकडे लक्ष वेधले आणि आपण जनसामांन्याच्या समस्या सोडविण्या साठी सदवै प्रयत्नरत राहु असे सांगितले.                                बैठकीमध्ये युवा तालुका कार्यकारिणी घोषित करण्यात आली. यावेळी पं. समिती, जि. परिषद क्षेत्रामध्ये आपल्याला कसं काम करता येईल यावर विचार विनिमय करण्यात आले. बैठकीचे अध्यक्ष प्रकाशजी नाकतोडे तालुका अध्यक्ष त्याचप्रमाणे डोंगरे साहेब जिल्हा कार्यकारिणी सदस्य, सुधीर खोब्रागडे  जिल्हा कार्यकारिणी सदस्य, युवा तालुका अध्यक्ष स्वप्नीलभाऊ बन्सोड होते तर आभार राहुल बारसागडे तालुका प्रवक्ता यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!