मूलचे हॉटेल झाले 'बियर बार'


 मूलचे हॉटेल झाले 'बियर बार'

मूल (प्रतिनिधी)

मूल शहरातील काही हॉटेल व्यावसायीकांकडून अवैद्य दारू विक्री होत असल्यांची खात्रीलायक माहिती असून, दोन हॉटेलला तर चक्क बियर बारचे स्वरूप आलेले आहे.  उल्लेखनीय म्हणजे, यातील एका हॉटेलात मूलचे पोलिसच सिवील ड्रेसवर 'चकना'सह दारूचा आस्वाद घेत असल्यांचे दिसून आल्यांने, अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

मूल शहरासह तालुक्यात दारूबंदीची अमंलबजावणी करण्यांस मूल पोलिसांना सतत अपयश येत आहे.  दिवसाढवळया चारचाकी वाहनाने अवैद्य दारू येत असून, ही दारूही पोलिसांच्या सरंक्षणात उतरविल्या जात आहे.  स्थानिक पोलिसांनी मूल शहरातील अवैद्य दारू विक्रेत्यांविरोधात मोठी कारवाई केल्यांचे दिसून आले नाही.  बाहेर गावी जाणारी दारू पकडणारे पोलिस शहरात येणारी दारू का पकडत नाही, हा प्रश्न मूल वासीयांना कायमचा पडला आहे.  तत्कालीन पालकमंत्री तथा विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी जागोजागी सीसीटिव्ही कॅमेरे दिले. यातून अवैद्य दारू विक्रीस आळा घालणे मूल पोलिसांना सहज शक्य आहे.  मात्र हप्तेवारीत गुंतल्या गेल्यांने, मूल पोलिसांनी अवैद्य दारू विक्रेत्यास मोकळे रान सोडले आहे.

याचाच परिणाम पूर्वी लपून विकल्या जाणारी दारू मूल—चंद्रपूर मार्गावरील एका हॉटेलात खुली मिळत असल्यांने व सोबत चकणाचाही  स्वाद घेता येत असल्यांने, मूल पोलिसांच्या कर्तव्यनिष्ठेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!