संजय गांधी निराधार योजने अंतर्गत केस मंजूर करण्याकरिता दलालापासुन सावधान राकेश या.रत्नावार,अध्यक्ष,संजय गांधी निराधार योजना समिती
आज दिनांक 17/02/2021 रोजी तहसिल कार्यालया,मूल येथे राकेश या.रत्नावार,अध्यक्ष,संजय गांधी निराधार योजना समिती यांचे अध्यक्षतेखाली लाभार्थ्याचे प्रकरणे मंजूर करण्याकरिता सभा आयोजित करण्यांत आलेली होती. सदर सभेला मा.तहसिलदार साहेब,मूल तसेच, संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य श्री.संजय गेडाम,सौ.रूपाली वाकुडकर,श्री.गंगाधर कुनघाटकर,श्री.सुनिल शेंन्डे,श्री.सत्यनारायण अमदुर्तीवार,सोनल मडावी,सौ.अर्चना चावरे,सदस्य पआदी उपस्थित होते. यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे 41 व श्रावणबाळ योजनेचे 53 अशी एकूण 94 प्रकरणे मंजूर करण्यांत आले. विशेष म्हणजे मागील वर्षाचे प्रकरणे मंजूर करण्यांत आली. सदर केसेस मंजूर करताना असे निदर्शनास आले की, सर्वसामान्य लाभार्थ्यांकडून दलाला कडून विविध आमीषे दाखवून त्यांची लुबाडणूक करीत आहेत.
तरी संजय गांधी योजने अंतर्गत समिती कडून तालूक्यातील सर्व लाभार्थ्यांना कळविण्यांत येते की, कुणीही दलालामार्फत प्रस्ताव सादर करण्यांत येवू नये. तहसिल कार्यालयातील संबंधित विभागाचे कर्मचाऱ्यांशी सपंर्क साधुन कागदपत्राची पुर्तता करण्यांत यावी. प्रस्तावा संबंधाने कांही अडीअडचणी असल्यास संबंधित योजना समितीच्या सदस्यांशी संपर्क करावा असे आव्हान समितीचे अध्यक्ष श्री.राकेश या.रत्नावार यांनी केले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!