बाम्हणी येथील मिरची सातऱ्याला आग; लाखोंची मिरची जळून खाक
नागभीड: (यश कायरकर)
नागभीड नगरपरिषद अंतर्गत येत असलेल्या बाम्हणी येथे गावाला लागून असलेल्या मिरची च्या साताऱ्याला आज दुपारी भीषण आग लागली... शॉट सर्किट ने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.. आग लागताच मिरची तोडण्याचे काम करीत असलेले सुमारे 200 च्या जवळपास महिला व पुरुष मजूर सैरावैरा पळाले... या आगीत मिरची साताऱ्यातील संपूर्ण मिरची जळून खाक झाली... त्यामुळे सुमारे 2 किलोमीटरवर मिरची ची खेव पसरली... गावातील लोकांना याचा नाहक त्रास झाला... सदर सातरा हा नागपूर येथील मलिक ट्रेडर्स या कंपनी च्या मालकीचा आहे ... यात अंदाजे 40 ते 50 लाख रुपयांचे नुकसान झाले... आग लागताच गावकऱ्यांनी मिळेल त्या साधनाने आग विजवण्याचा प्रयत्न केला.. घटनेची माहिती मिळताच नागभीड व ब्रम्हपुरी नागरपरिषदेचे अग्निशमन दल उपस्थित झाले व आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.. यावेळी या प्रभागाचे नगरसेवक दिनेश गावंडे,पोलीस कर्मचारी,व अग्निशमन दलाचे अधिकारी उपस्थित होते... अगदी गावालगत हा सातारा असल्याने गावाला पुढील काळातही धोका असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!