"त्या" मोरीचे काम तातडीने करा - अनिल मडावी यांची मागणी
पाथरी (प्रतिनिधी)
पाथरी येथील विश्वनाथ ठाकरे यांचे घराजवळील नालीवरील मोरी फुटल्याने रहदारीस अडथळा निर्माण झालेला आहे. त्यामुळे ही मोरी तातडीने दुरुस्त करावी अशी मागणी आम आदमी पार्टीचे सावली तालुका अध्यक्ष अनिल मडावी यांनी निवेदनाद्वारे ग्रामविकास अधिकाऱ्याकडे केली आहे.
पाथरी येथील वार्ड नंबर 1 मध्ये सांडपाणी वाहून जाण्याकरिता विश्वनाथ ठाकरे यांचे घराजवळील रस्ता विभागून नाली तयार करण्यात आली. या नालीवर मोरी बांधण्यात आले. मात्र मागील काही दिवसापासून ही मोरी फुटल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झालेला आहे व नागरिकांची गैरसोय आहे. ही बाब लक्षात घेता ही मोरी तातडीने दुरुस्त करावी अशी मागणी श्री. मडावी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!