वाढोणा येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज याची 52 वी पुण्यस्थिती साजरी
ताळोधी (बा.) : (यश कायरकर)
तळोधी अप्पर तालुक्यातील वाढोणा येथील अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ वाढोणा यांच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज याची 52 आणि गाडगे महाराज यांची 64 पुण्यस्थिती जुना बाजार चौकात साजरी करण्यात आली .पहाटेला संपूर्ण गावातून ग्रामसफाई करण्यात आली त्यानंतर संताची पालखी काढून रामधून काढण्यात आली. या 2 दिवशीय कार्यक्रमात रांगोळी स्पर्धा , भजन स्पर्धा , व राष्ट्रसंताच्या विचारांवर मार्गदर्शन म्हणून कविता सोनवाणे यांनी महिलांना शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक नियोजन यावर मार्गदर्शन केले. नामदेवजी बावणे महाराज यांनी तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराज याच्या विचार मंथन करून समाजसेवा करावी असे मार्गदर्शनातून सांगितले. कार्यक्रमाला उपस्थित म्हणून देवेद्रजी गेडाम सरपंच ,अनिल डोर्लीकर,ग्रा.पं.सदस्य,विठ्ठल गजभे,बाबुराव येसनसुरे ,मुखरू मस्के ,विनायक आंबोरकर आदि मा.यांची उपस्थिती होती. त्यावेळी स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आला त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला . सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता गुरुदेव सेवा मंडळ तथा ग्रामवासीय महिलानी सहकार्य केले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!