तळोधी (बा) अप्पर तालुका परिसरातील 5 पैकी 5 ही ठिकाणी कांग्रेसचीच सत्ता स्थापन.
तळोधी (बा.)
नागभीड तालुक्यात नुकत्याच 15 फेब्रुवारीला पार पडलेल्या तिसऱ्या टप्प्यातील सरपंच पदाच्या निवडीमध्ये , अप्पर तालुका तळोधी (बा.) येथील परिसरातील पाच ग्रामपंचायतींचे सरपंच उपसरपंच निवडण्यात आले त्या पाचही ग्रामपंचायत मध्ये काँग्रेस पक्षाचे वर्चस्व दिसून आले. ग्रामपंचायतींपैकी *वलनी* ( मेंढा) येते 6 विरुध्द 3 ने काँग्रेसने बाजी मारत काँग्रेसचे सरपंचपद अनिल भाऊ बोरकर व उपसरपंचपदी प्रकाश सुरपाम यांची निवड झाली. *कन्हाळगांव* येथे अविरोध पने सरपंचपदी रमेश भाऊ घुगुस्कर व उपसरपंच पदी लीलाधर बोरकर हे निवडून आले. त्याचप्रमाणे *चारगाव* येथेसुद्धा अविरोध सरपंचपदी सौ. अनिता अनिल पेंदाम व उपसरपंचपदी सौ. वर्षा रणधीर राऊत यांची निवड झाली. तर *नांदेड* येथे 6 विरुध्द 3 ने काँग्रेसने बाजी मारत काँग्रेसचे सरपंचपदी मुरलीधर गौरकर व उपसरपंचपदी जावेद पठाण यांची निवड झाली त्याच प्रमाणे *बाळापुर* (खुर्द) येथेसुद्धा काँग्रेसचे सरपंच कमलाकर गोविंद ठवरे व उपसरपंच म्हणून सरोज धनाजी मेश्राम यांची निवड झाली.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!