डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत सिंचन विहीर व सिंचनाची साधने मंजूर झालेल्या लाभार्थ्यांचे विद्युतीकरण करण्याकरिता वीजजोडणी आकार (demand) देण्याबाबत

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व  बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत सिंचन विहीर व सिंचनाची साधने मंजूर झालेल्या लाभार्थ्यांचे विद्युतीकरण करण्याकरिता वीजजोडणी आकार (demand) देण्याबाबत 

बिरसा मुंडा कृषी योजना सन 2018_19/ 2019 20 अंतर्गत पोंभुर्णा तालुक्यातील लाभार्थ्यांची सिंतन विहिरीवर विद्युत मोटर पंप खरेदी व विज जोडणी आकार  अनुदान मिळणे करिता निवड झालेली होती त्याकरिता पोंभुर्णा तालुक्यातील सातारा तूकूम. सातारा भोसले, सातारा उमरी, पोद्दार उमरी, येथील निवड झालेल्या लाभार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज लाभार्थ्यांचे यादीसह व संबंधित योजनेचे वैयक्तिक लाभार्थी जोडणी आकार (demand ) मिळण्याकरिता आपल्या कार्यालयात अर्ज सादर करण्यात आले होते आपल्या निर्णय अधिनिस्त असलेले कर्मचारी (line men ) संबंधित योजनेच्या लाभार्थ्यांच्या शेतातील सिंचन विहीरीचे सर्वे करून तसा अहवाल आपल्या कार्यालयात सादर करण्यात आला आहे परंतु अजून ही सदर योजनेच्या लाभार्थ्यांना मागील सात(7) महिन्यांपासून विद्युतीकरणाचे बील जोडणे आकार (demand )दिलेले नाही त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांचे वीज जोडणी आकाराचे अनुदान निधी परत जाण्याच्या मार्गावर असल्यामुळे संबंधित लाभार्थ्यांना अनुदानापासून वंचित राहावे लागत आहे तरी येत्या दहा दिवसात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना कृषी क्रांती योजना अंतर्गत लाभार्थ्यांच्या लाभार्थ्यांना वीज जोडणी आकार (demand) देण्यात यावे अन्यथा श्रमिक एल्गार आंदोलन करेक्शन मागणी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!