बल्लारपुरातील मोठ्या व्यापारीवर हल्ला : अज्ञात दुचाकी चालक रोख रक्कम घेउन पसार
बल्लारपुर -(धनंजय पांढरे)
रविवारी रात्री ९ वाजता स्थानिक विवेकानंद वॉर्डातील कनू पान मटेरियल चे संचालक हरीशभाई ठक्कर आपली दुकान बंद करून घरी जात असताना वाटेत तोंड झाकलेल्या दोन युवकांनी आपली एक्टिवा मोपेड रस्ता अडवून त्यांना वाटेत रोखले. पान मटेरियल दुकानाचे संचालक हरीशभाई ठक्कर यांचे कडून जबरदस्तीने बॅग हिसकावून घेतली. व्यापाऱ्याने विरोध करण्याच्या प्रयत्न केला असता तोंड झाकलेल्या दोन युवकांनी धारदार शस्त्राने व्यापाऱ्याला जखमी केले व बॅग हिसकावून पळून गेले.
बल्लारपूर पोलिसात अद्याप कोणतीही तक्रार करण्यात आली नव्हती. व्यावसायिकाने सांगितले की बॅगमध्ये पैसे नव्हते, त्यामुळे रिपोर्ट केली नाही. बॅग मध्ये बिलबुक व आवश्यक कागदपत्र होते. व्यापाऱ्याच्या डोळ्यावर इजा झाली असून दोन टाके लागले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!