भीमा- कोरेगाव शौर्यदिन रक्तदानाने केला साजरा
भीमा- कोरेगाव शौर्यदिन रक्तदानाने केला साजरा
चंद्रपूर, ता. १ : अन्यायी, अत्याचारी, जातीयवादी पेशवाईचा भीमा-कोरेगाव येथे अंत करणाऱ्या शूरविरांना १ जानेवारी रोजी मानवंदना देत रक्तदान शिबिर आयोजित करून हा शौर्यदिन साजरा करण्यात आला.
समता सैनिक दलाच्या वतीने स्थानिक पंचशील बुद्धविहार परिसरात या शिबिराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला पंचशील बुद्ध मंडळाचे अध्यक्ष कपिल उमरे, उपाध्यक्ष, राहुल शेंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून मधुकर उमरे, अरुणा शेंडे, समता सैनिक दलाचे मार्शल अजय धोटे, गौतम येसांबरे उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी भीमा- कोरेगावची लढाई व त्यात सहभागी झालेल्या आणि प्राणाची आहुती देणाऱ्या शूर सैनिकांचा इतिहास सांगत प्रत्येकाने अन्यायाविरुद्ध लढ्यासाठी तत्पर राहावे, असे आवाहन केले. या शिबिरात समता सैनीक दलाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह परिसरातील नागरिकांनीही रक्तदान केले. कार्यक्रमाला बौद्ध उपासक, उपसिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी साहिल मोटघरे, संदेश पाटील व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.
बातमी -मुकेश वाळके


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!