अतिरिक्त व्याजाचे पैसे व अनुमतीशिवाय कपात रक्कम बचत खात्यात जमा करा !
प्रहारची सिंहगर्जना
अन्यथा प्रहार स्टाईलने आंदोलन करू!
प्रहारचे गजू कुबडे यांचा प्रशासनाला ईशारा !
सावरी - प्रतिनिधी ( विनोद उमरे )
सावरी (बी) : - महाराष्ट्र्र शासनाने जाहीर केलेल्या महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफी दिलेली असतांना जिल्ह्यातील बहुतांश राष्ट्रीयीकृत बँका कर्जदार शेतकऱ्यांच्या अनुमती शिवाय शेतकऱ्यांच्या खात्यातून ही रक्कम कर्ज खात्यात जमा केल्याने असंख्य शेतकरी हा आर्थिक अडचणीत सापडलेला असून ही कपात केलेली रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अन्यथा येत्या 20 जानेवारी पासून प्रहारच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची राहील असा इषारा प्रहारचे पूर्व विदर्भ प्रमुख रुग्णमिञ गजु कुबडे यांनी एका निवेदनातून दिलेला आहे.
यासंदर्भात गजु कुबडे यांनी जिल्हाधिकारी वर्धा यांना दिलेल्या निवेदनातून दिलेल्या माहितीनुसार, सरकारने महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 माध्यमातून शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केलेली होती.परंतु येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे प्रबंधक श्री अनंत देव यांनी बँक स्वतःच्या मालकीची समजून मनमर्जीने शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक केलेली आहे.शेतकऱ्यांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेत अतिरिक्त व्याजाच्या नावे त्यांच्या कडून स्वतः बँकेच्या विड्रॉल स्लिप वर शेतकऱ्यांच्या सह्या जबरदस्तीने घेऊन अतिरिक्त व्याजाच्या नावे त्यांच्या सेविंग खात्यातून वसूल करण्यात आली परंतु प्रहारच्या वतीने रुग्णमित्र-गजु कुबडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी साहेब वर्धा यांच्या कडे निवेदनाद्वारे पाठपुरावा केल्याने बँकेने पैसे परत केले परंतु ते पैसे बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यावस्थापक यांनी हेतुपुरस्सर पणे कर्ज खात्यात पणे जमा केले ती रक्कम त्यांच्या सेविंग खात्यात जमा करण्यात यावी .या गंभीर प्रकरणाची दखल घेत प्रहारचे गजुभाऊ कुबडे यांनी जिल्हाधिकारी वर्धा व तहसीलदार हिंगणघाट यांचेकडे निवेदन देऊन हा मुद्दा मांडला.या प्रकरणाची सत्यता तपासून या बाबत महाराष्ट्र्र बँकेचे शाखा व्यवस्थापक श्री देव यांना याबाबत जाब विचारून त्यांना धारेवर धरले.या बँकेच्या अधिकाऱ्यांनी डेबिट केलेल्या व्याजाची रक्कम बचत खात्यात जमा न करता थेट पीक कर्ज खात्यात जमा केली.तसेच शेतकऱ्यांनी सीसीआयला विकलेल्या कापूस चुकार्याची रक्कम ही शेतकऱ्यांच्या बचत खात्यात जमा न करता शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा केली.त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा झालेली रक्कम बँकेने कापून घेऊन शेतकऱ्यांसमोर गंभीर संकट निर्माण केलेले आहे.आधीच शेतकरी हा या वर्षी आलेल्या सोयाबीन पीक खोडकिडी व बुरशीजन्य किडीच्या प्रादूर्भावाने पिके नष्ट झाल्याने त्रस्त आहेत.त्याच प्रमाणे गुलाबी बोड अळीच्या प्रादूर्भावाने कपाशीचे पीकही हातून गेले आहे अशा दुहेरी संकटाने शेतकरी आधीच गलितगात्र झालेला असल्याने त्यात पुन्हा बँक अधिकाऱ्यांनी मनमानी करून शेतकरी मोट्या आर्थिक संकटात सापडलेला आहे.कुटुंबाचे संगोपन करणे आता त्याला कठीण झालेले आहे.त्यामुळे सी.सी.आय.मार्फत जमा केलेली रक्कम कर्जखात्यातून वळती करून ती शेतकऱ्यांच्या बचत खात्यात वळती करावी .अन्यथा येत्या 15 जानेवारीला प्रहार तर्फे भव्य आंदोलन बँकेसमोर करण्यात येईल असा इशारा प्रहारचे पूर्व विदर्भ प्रमुख श्री गजुभाऊ कुबडे यांनी प्रशासनाला दिलेला आहे.
या निवेदनाच्या प्रती कृषी मंत्री,ना.बच्चूभाऊ कडू महसूल आयुक्त व अन्य संबंधित अधिकाऱ्यांना दिलेला आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!