शिक्षक भारती चंद्रपूर द्वारा मा.शिक्षण उपसंचालक यांना विविध समस्यांबाबत निवेदन

जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )

चंद्रपूर : -  दि. ०५/०१/२०२१ ला शिक्षण उपसंचालक , नागपूर विभाग नागपूर कार्यालयात  मा.श्रीराम चव्हाण शिक्षण उपनिरीक्षक यांना शिक्षक भारती संघटना चंद्रपूर जिल्हा द्वारा शिक्षकांच्या संदर्भातील विविध समस्यांचे निवेदन देण्यात आले .याप्रसंगी भास्कर बावणकर जिल्हा अध्यक्ष,भाऊसाहेब पत्रे नागपूर विभागिय अध्यक्ष, विनोदभाऊ पिसे सचिव चंद्रपूर जिल्हा मुख्याध्यापक संघ किशोर  वरभे राज्य संघटक, संजयजी खेडीकर राज्य संयुक्त कार्यवाह,विजय वांदिले सर प्रामुख्याने उपस्थित होते. निवेदनात प्रामुख्याने २०% अनुदानीत तुकड्यांवरिल शिक्षकांचे समायोजन करणे. 1901 या लेखाशिर्षा वरिल वेतन अनुदान घेणाऱ्या शाळांना NON PLAN मध्ये वळवण्या बाबत . 2019 - 20 चे वेतनेत्तर अनुदान मिळण्या बाबत  अशा अनेक मागणींचे निवेदन देण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!