गाव विकासासाठी बेरोजगार युवक उतरले निवडणुकीच्या रिंगणात

नऊ पैकी आठ उमेदवार उच्च व विद्याविभूषित

पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )

पळसगाव : - चिमुर येथून जवळच असलेल्या आंबोली गाव त्या छोट्याशा गावात उच्चविद्याविभूषित विद्यार्थी असून सध्या ते बेरोजगार आहे...   हे सगळे विद्यार्थी एकत्र आले  गावातीलच विकासासाठी मागील दोन वर्षापासून सामाजिक कार्य सुरू केले  गावातील समस्या  वारंवार सरपंच व ग्रामपंचायत यांना सांगण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्या या समस्याकडे ग्रामपंचायतने कानाडोळा केला त्यामुळे या युवकांनी यावेळी ग्रामपंचायत निवडणुकीत  युवकांची पॅनल तयार करून थेट निवडणूक रिंगणात उतरले आणि या गावात दिग्गजांच्या समोर हे बेरोजगार युवक आमोरा समोर आले आहे शंकरपूर पासून जवळच असलेल्या आंबोली  हे एक गाव या गावात नऊ सदस्य असलेली  ग्रामपंचायत आहे  या गावातले युवक व युवती शिक्षणासाठी बाहेर गेले होते बाहेरूनच शिक्षण घेऊन ते गावात आले गावात या युवकांनी गाव सुधारणे साठी युवा मंच ची स्थापना केली या माध्यमातून त्यांनी मुलींना प्रशिक्षण देण्याचे काम केले यासोबतच नाल्या व रस्ते स्वच्छ केले गवतकाडी झुडपाने वेढलेली स्मशानभूमी स्वच्छ केली या शिवाय लोकांना शासकीय प्रशासकीय कामात  मदत लागत होती किंवा कोणतीही अडचण येत होत्या त्या अडचणी सोडवण्याच महत्त्वाचं कार्य युवा मंच विद्यार्थ्यांनी केली सर्वात म्हणजे लॉकडाऊन काळात सर्व शाळा बंद होत्या पण या युवकांनी गावातील बालगोपाल विद्यार्थी यांना एकत्र करून त्यांना शिक्षण देण्याचं काम केलं गावातील भिती बोलक्या केल्या गाव विकासासाठी ग्रामपंचायत वर सत्ता असणे गरजेचे आहे हे त्यांना समजून आले  त्यामुळे त्यांनी या ग्रामपंचायत च्या निवडणुकीत आपणच उभे राहून गावाचा विकास घडवूया असा संकल्प केला आणि हे उच्चविद्याविभूषित विद्यार्थी युवा मंच परिवर्तन पेनल तयार करून निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत त्यात वॉर्ड नंबर एक मधून कला शाखेचा पदवीधर असलेल्या केशव गजबे बीएड झालेली प्रतिमा शिवरकर दहावी असलेली कल्पना बगळे  वार्ड नंबर दोन मधून इंजिनीयर शाखेचा अभियंता वैभव ठाकरे कला शाखेचा पदवीधर शालिनी दहोत्रे  वाणिज्य शाखेत पदवी असलेला शुभम मंडपे कृषी शाखेत बीएससी असलेला स्वप्निल गजबे सायन्स शाखेची पदवी असलेली प्रियंका नागोसे आणि कला शाखेत पदवीधर असलेली रज्जू सवाईकर या युवकांनी रिंगणात भाग घेतलेला आहे हे सर्व युवक सत्तावीस वर्षाच्या आतील आहेत  या युवका जवळ निवडणुकीसाठी लागणारा खर्च नसल्यामुळे यांनी गावात आव्हान करून आर्थिक मदतीची मागणी केली आहे याशिवाय सोशल मीडियावर आर्थिक मदतीचे आव्हान  केलेले आहे  हे युवक रिंगणात उतरल्या मूळे गावात असलेल्या दिग्गजां ना पराभूत करतात की नाही  हे येणारे निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी दिसेल परंतु हे युवक निवडणुकीत रिंगणात असल्यामुळे दिग्गजांच्या भुवया मात्र उंचावलेल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!