राजुरा येथे पत्रकार दिन साजरा - कोरोना योद्धाचा सत्कार

आमदार सुभाष धोटे यांची डिजिटल अभ्यासिके साठी दहा लाखाच्या निधीची घोषणा 

राजुरा - प्रतिनिधी ( रोशन येवले )

राजुरा : - ९ ऑगस्ट २०२१ मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीदिनी राजुरा तालुका पत्रकार संघातर्फे पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी पत्रकार, कोरोना योद्धा आणि आरटी वन वाघ जेरबंद करणाऱ्या वनविभाग अधिकारी यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला.
          कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सुभाष धोटे होते. कार्यक्रमाचे उदघाटन माजी आमदार अँड. वामनराव चटप यांचे हस्ते झाले. प्रमुख अतिथी माजी आमदार सुदर्शन निमकर,नगराध्यक्ष अरुण धोटे, श्रीमती सुमनताई मामुलकर, व्यापारी संघाचे अध्यक्ष राधेश्याम अडानिया, वकील संघाचे अध्यक्ष अँड.निनाद येरणे, पोलिस निरीक्षक नरेंद्र कोसुरकर, डॉ. लहु कूळमेथे  ईत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. सर्वप्रथम बाळशास्त्री यांच्या प्रतिमेला हार अर्पण व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
           यावेळी बोलताना आमदार सुभाष धोटे म्हणाले की, पत्रकारानी एकाच दृष्टिकोनातून विचार न करता सर्व थरातील नागरिकांच्या समस्याना प्राधान्य देऊन त्याविषयी लिहिले पाहिजे. शेतकरी व ग्रामीण भागातील जनता ही नेहमीच दुर्लक्षित राहिली असून अशा वंचित आणि तळागाळातील नागरिकांचा आवाज पत्रकारांनी बनण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार सुभाष धोटे यांनी यावेळी केले. पत्रकार संघाचा डिजिटल अभ्यासिका व ग्रंथालयासाठी दहा लाखाचा निधी आपल्या स्थानिक विकास निधीतून देण्याचे त्यांनी घोषित केले. यावेळी बोलतांना माजी आमदार अँड.वामनराव चटप यांनी पत्रकारांनी समाजाप्रती विधायक दृष्टिकोन ठेवून कार्य करण्याची गरज असून लोकशाहीच्या तिन्ही स्तंभावर, त्यांच्या कार्यावर लक्ष ठेऊन प्रसंगी लेखणीद्वारे अंकुश ठेवण्याचे महत्कार्य करायचे असल्याचे भान ठेवण्याची गरज प्रतिपादित केली. आपल्या कार्यकाळातील विविध प्रसंग सांगून अँड.चटप यांनी आरोग्यसेवा ही अत्यंत महत्वाची  सेवा असून ते कार्य मिशन प्रमाणे करणार्‍या डॉक्टर व कर्मचाऱ्यांची तसेच नरभक्षक वाघाला जेरबंद केल्याबद्दल वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची प्रशंसा केली. माजी आमदार सुदर्शन निमकर यांचेही यावेळी भाषण झाले. यावेळी मुक्त पत्रकार व विधी अभ्यासक अँड. दिपक चटप यांनी लिहिलेल्या शेती कायदे विषयक पुस्तकाचे प्रकाशन झाले.
             या कार्यक्रमात स्व. महियार गुंडेविया स्मृती पुरस्कार मसूद अहमद, प्रभाकरराव मामुलकर स्मृती पुरस्कार गणेश बेले, राघवेंद्रराव देशकर स्मृती पुरस्कार रत्नाकर चटप, सुरेंद्र डोहे स्मृती पुरस्कार सिद्धार्थ गोसावी, शंकरराव देशमुख स्मृती पुरस्कार संतोष कुंदोजवार  यांना अतिथीच्या हस्ते शाल, श्रीफळ,सन्मानचिन्ह, रोख रक्कम व पुष्पगुच्छ प्रदान करण्यात आले. कोरोना महामारी काळात उत्कृष्ट सेवा देणार्‍या वैद्यकीय अधीक्षक डॉ.लहू कुळमेथे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रकाश नगराळे, पालिका सभापती वज्रमाला बोलमवार, डॉ.बिपीनकुमार ओदेला,डॉ.माधुरी वैद्य, मुख्य परिचारिका रिता रॉय, प्रितू झाडे, उमेश डहाळे,संजय मंथनवार,आरोग्यसेवक अनिल देठे, बालाजी गोटमुखले, आरोग्यसेविका मंगला चव्हाण, आशा स्वयंसेविका किरण कलास्केकर, बबीता तालन,मंगला मेश्राम आणि नगर पालिकेचे सफाई कर्मचारी नीलेश टाक यांचा शाल,श्रीफळ,सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला.
              राजुरा क्षेत्रातील दहा नागरिकांचे बळी घेणार्‍या वाघाला जेरबंद केल्याबद्दल वनविभागाच्या अधिकारी व सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने राजुरा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी विदेशकुमार गलगट यांनी सन्मान स्विकारला. कार्यक्रमाचे संचालन आनंद चलाख व बादल बेले, प्रास्ताविक अनिल बाळसराफ व आभार प्रदर्शन बि.यू. बोर्डेवार यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने गणमान्य नागरिक,पत्रकार व महिला उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!