स्वप्न रंगविण्या आधीच भंगलं गं ...

आज भंडारा येथे सरकारी इस्पितळात दुर्दैवी घटना घडली हॉस्पिटलला आग लागल्याने 10 बालके जळून खाक झाली.  जगात पाऊल ठेवल्यानंतर जग बघण्या आधीच या बालकांचा दुर्दैवी अंत झाला. या कोवळ्या जिवाला शब्दबद्ध करणारी ही काव्य श्रद्धांजली


आई ,
मी तुझा बाळ गं ..
छोटासा पिल्लू गं ...
जगाचं सुंदर स्वप्न 
रंगविण्या आधीच 
कसं भंगलं गं ...

मध्यरात्रीचा 
काळ गं...
धुरांचे ते लोटं गं ...
मी, नाही 
रोखू शकलो 
माझा श्वास गं ...
आई 
मी तुझा बाळ गं ..
जगाच सुंदर स्वप्न 
रंगविण्या आधीच 
कसं भंगलं गं ....

आई 
तू मला 
नऊ महिणे 
नऊ दिवस 
पोटात वाढवलसं गं 
घटट नाळं कसी जुळली होती गं
तुझ्या मायेचा हात सतत फिरायचा गं
तू मला किती जपली 
होतीस गं ...
पण,
ती काळ रात्र 
कशी चालून आली बघं गं...
आई 
मी तुझा बाळ गं ..
जगाच सुंदर स्वप्न 
रंगविण्या आधीच 
कसं भंगलं गं....

तुझ्या कुशीत गं
मी,
तुझ्या मिठीत गं
अमृताचा पाझर
माझ्या ओठात गं
बोबडे बोल बोलण्याआधीच 
ही देवलोकाची यात्रा गं....
आई 
मी तुझा बाळ गं ..
जगाच सुंदर स्वप्न 
रंगविण्या आधीच 
कसं भंगलं गं...

माझ्या जन्माने 
किती आनंदी तुम्ही होता गं
बाबाचं बोट धरून 
मी चालायला शिकणार होते गं
रांगायला,दुडूदूडू धावायला 
तू मदत करणार होतीस गं
बोबडया बोबडया बोलानी 
घर कसं दुमणार होतं गं
का , असा झाला 
घात ?
त्यात माझा श्वास 
गुदमरला गं ....
आई 
मी तुझा बाळ गं ..
जगाच सुंदर स्वप्न 
रंगविण्या आधीच 
कसं भंगलं गं ....

गोकूळातला आनंद 
हिरावला गं
माझ्या तोंडी 
तुझा घास तुटला गं
आई शब्दाला 
तू मुकली गं
सुंदर जगातील माझे
सखे सोबती 
दूर राहिले गं
तुझ्या पदरात 
मी कसा लपणार गं
कुशीत तुझ्या 
निजता निजता
धुराने कसा 
घात केला गं
आई 
मी तुझा बाळ गं ..
जगाच सुंदर स्वप्न 
रंगविण्या आधीच 
कसं भंगलं गं...


मी तुझा कन्हैया 
तू माझी यशोदा 
हे सारे आता
दूर राहिले गं ...
आई 
मी तुझा बाळ गं ..
जगाच सुंदर स्वप्न 
रंगविण्या आधीच 
कसं भंगलं गं...

 श्री. विनायक रेकलवार मूल

 


------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!