चिमूर तालुक्यातील सावरी (बिडकर) या गावी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ५२ वा पुण्यस्मरण सोहळा संपन्न
सावरी - प्रतिनिधी ( विनोद उमरे )
सावरी बी : - चिमूर तालुक्यातील सावरी (बिडकर) या गावी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ५२ वा पुण्यस्मरण सोहळा आयोजित करण्यात आला होता.सावरी(बिडकर) येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ५२ पुण्यस्मरण सोहळा गुरुदेव सेवा मंडळ सावरी व समस्त ग्रामवासी यांच्या सहकार्याने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ५२ पुण्यस्मरण सोहळा आयोजित करण्यात आला त्या निमित्ताने १०व११ जानेवारी २०२१ या दोन दिवसीय कार्यक्रम आयोजित करण्यात आले कार्यक्रमाचे अनुषंगाने विविध कार्यक्रम घेण्यात आले. त्या मध्ये १० जानेवारी रोजी रविवारला सकाळी ४ते ५.३० वा.ग्रामसफाई , सकाळी ५.३०ते ६.३०वा. सामुदायिक ध्यान, सकाळी ७ वा. रामधुन मध्ये मोठा संख्येने भजन मंडळी यांनी सहभाग घेतला, दुपारी १२ते ५ वा.भजन स्पर्धा या स्पर्धेत मोठ्या संख्येने स्पर्धेकानी भाग घेतला व दुसऱ्या दिवशी ११जानेवारी सोमवारला सकाळी५.३० ते६ .३० वा.सामुदायिक ध्यान, सकाळी ७ ते १० वा.ग्रामसफाई सांडपाणी व्यवस्थापन, नंतर दुपारी १ते १.३० काल्याचे किर्तन व १.३० ते महाप्रसाद देऊन कार्यक्रमांची सांगता करण्यात आली.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!