चिमूर शहरात प्रथमच कार AC मशीन चे पोलीस उप निरीक्षक यांचे हस्ते झाले उद्घाटन

जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )

चंद्रपूर : - दिनांक.१२/०१/२०२१ ला चिमूर शहरात प्रथमच लाईफ लाईन अलायमेंट सर्व्हिसिंग सेंटर मध्ये कार AC मशीन चे आर.पी. गायकवाड पोलीस उप निरीक्षक यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले.या अगोदर चिमूर तालुक्यामध्ये एकही कार AC मशीन ची दुकान नसल्याने प्रत्येक चार चाकी कार ला घेऊन नागपूर चंद्रपूर या शहरांकडे १०० किमी अंतरावर धाव घ्यावी लागत होती व ५०० ते ७०० रुपये येणारा खर्च हा दुप्पट लागत होता. या सर्व बाबींपासून मुक्ती मिळणार असून उन्हाळ्यात कार मध्ये AC भरणे सोईस्कर आणि पैशांची बचत होईल. यावेळी प्रवीण मोदी , अमित मोदी , विनोद शिवरकर , मयूर डाहुले , अमोल साटोने , अमोल रणदिवे, व आदींची उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!