मूल तालुका शिवसेनेतर्फे ममता दिन साजरा
मूल तालुका शिवसेनेतर्फे ममता दिन साजरा
मूल ( अमित राऊत )
मुल तालुका शिवसेना कार्यालयात तमाम शिवसैनिकांची माऊली वात्सल्यमूर्ती स्व.माँ.साहेब मीनाताई ठाकरे यांच्या जंयती च्या अनुषंगाने पवित्र स्मृतीस उजाळा मिळावा यासाठी ममतादिन साजरा करण्यात आला.
मुल शिवसेना कार्यालयात माॅ.साहेबाची जंयती साजरी करण्यात आली. तसेच मुल उपजिल्हा रुग्णालयात कुपोषित बालकांना पोषक पोषण कीट तसेच रूग्णालयात रूग्णांना फळ व बिस्किट चे वाटप करण्यात आले. सर्व बालकांच्या मातानी समाधान व्यक्त केले. यानिमित्याने
अनेक युवकांनी याप्रसंगी मुख्यमंत्री उध्दवसाहेब ठाकरे तसेच जिल्हाप्रमुख संदिप गिर्हे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन शिवबंधन बांधुन शिवसेनेत प्रवेश घेतला.
मुल तालुका शिवसेना प्रमुख नितीन येरोजवार यानी आपल्या भावना व्यक्त करत म्हणाले की माॅ.साहेब सर्व शिवसैनिकावर आपल्या पाल्यासारख प्रेम करायच्या त्यांची वात्सल्य प्रेम शिवसैनिक अखेरच्या श्वासापर्यंत विसरू शकत नाही.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!