तालुका अध्यक्षपदी बाळूभाऊ भोयर तर सचिवपदी शाहिद अख्तर यांची नियुक्ती

म.राज्य मराठी पत्रकार संघाची कार्यकारिणी गठित
   
प्रा, वसंत माणुसमारे याना जिल्हा सदस्य पदी निवडले 

तालुका  -  प्रतिनिधी (आलेख रट्टे)

वरोरा : - महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा वरोरा ची १७जानेवारीला हिरालाल लोया कनिष्ठ महाविद्यालयात संघाचे अध्यक्ष प्रा.वसंत माणूसमारे यांचे अध्यक्षतेखाली सभा आयोजित करण्यात आली. सभेला संघाचे पूर्व विदर्भ प्रांतीय अध्यक्ष महेश पानसे,जिल्हाध्यक्ष सुनिल बोकडे,सरचिटणीस जीतेंद्र चोरडिया, कोषाध्यक्ष राजु कुकडे ऊपस्थित होते.
     संघाच्या चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणीत प्रा.वसंत माणूसमारे यांची निवड झाल्याने त्यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा जिल्हाध्यक्ष सुनिल बोकडे यांचेकडे सभेत सुपूर्द केला.त्यानंतर वरोरा तालुका संघाची नवीन कार्यकारिणी  गठित करण्यात आली. अध्यक्षपदी बाळु भोयर, तर सचिव पदी शाहिद अख्तर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. कार्याध्यक्ष पदी जयंत आंबेकर ,ऊपाध्यक्ष पदी हरिष केशवानी आणि प्रविण मुधोळकर ,कोषाध्यक्ष पदी प्रदिप कोहपरे ,संघटकपदी शाम ठेंगडी,
प्रसिद्धी प्रमुख सादिक थैम यांची अविरोध निवड करण्यात आली. मार्गदर्शक म्हणून मनोज श्रीवास्तव, सतीश चौहान आणि सदस्य पदी प्रा.वसंत माणूसमारे ,प्रविण गंधारे,खेमचंद नेरकर, विजय आंबेकर, मनिष भुसारी, राजेंद्र मर्दाने, प्रतीक माणूसमारे, आलेख रठ्ठे यांची एकमताने निवड करण्यात आली. सभा यशस्वी होण्यासाठी 
शाम ठेंगडी, हरिष केशवानी, खेमचंद नेरकर ,प्रतीक माणूसमारे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.सभेत संघाच्या दिनदर्शिका चे प्रकाशन करून सदस्यांना वितरण करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!