क्रिश्नानगर येथील युवकांचा युवासेनेत पक्षप्रवेश
क्रिश्नानगर येथील युवकांचा युवासेनेत पक्षप्रवेश
महाराष्ट्राचे पर्यावरण- पर्यटक ,तथा राजशिष्टाचार मंत्री, युवासेना प्रमुख, मा. आदित्य साहेब ठाकरे यांच्या कार्यावर प्रेरीत होऊन, युवासेना कार्यकारी सदस्य रूपेशदादा कदम ,युवासेना जिल्हा विस्तारक नित्यानंद त्रिपाठीजी, शिवसेना जिल्हा प्रमुख संदिपजी गिर्हे यांच्या मार्गदर्शनाखाली व युवासेना जिल्हाप्रमुख इंजि. निलेशभाऊ बेलखेडे,महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख मायाताई पटले यांच्या नेतृत्वात मीनाताई यादव,कल्पना ताई मेंढाळकर ,युवासेना शहरप्रमुख अक्षय अंबिरवार ,माजी उपशहर प्रमुख प्रितम लोनकर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये क्रिश्नानगर येथील सुशिक्षित युवकांनी युवासेनेत प्रवेश केला .यावेळी मार्गदर्शन करतांना युवासेना जिल्हा प्रमुख (युवाधिकारी) यांनी महाराष्ट्रात शिवसेना, युवासेनेच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमाविषयी माहिती देण्यात आली. नुसत्या शाखा गठीत न करता आपल्या मार्फत जनसेवेचे कार्य घडू द्या व लोकांच्या मना मनामध्ये शिवसेना रूजविण्याकरिता तत्पर राहावे असे मार्गदर्शन केले.यावेळी मायाताई पटले, युवासेना शहर प्रमुख अंबिरवार यांनी सुद्धा युवकांना मार्गदर्शन केले. चंद्रपूर शिवसेनेसोबतच युवासेनाच्या मार्फत मोठ्या प्रमाणात युवासंवाद, विविध कार्यक्रम, युवकांच्या समस्या सोडविल्या जात असल्याने मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश हाेत असून जिल्ह्यात दोन्ही युवा नेत्रुत्वात पक्ष वाढीस बळकटी निर्माण होतांना दिसत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!