पतंजलीच्या योग शिबिराचा समारोप संपन्न
विठ्ठल मंदिर स्टेडियम येथे यंग चांदा ब्रिगेड व महिला पतंजली योग समितीच्या संयूक्त पुढाकाराने आयोजित पाच दिवसिय योग शिबिराचा आज दिनांक 3/1/2021समारोप कार्यक्रम घेण्यात आला. व हा कार्यक्रम 7/1/2021 पर्यंत चाल्ला. आजच्या सत्रामध्ये योग व प्राणायामाद्वारे शारिरीक व्याधींवर नियंत्रण तसेच औषधिय उपचार व आहार - विहार याविषयी श्री मसराम सर व सौ.ज्योतीताई मसराम यांनी उपयूक्त मार्गदर्शन केले. हा योग प्रशिक्षणाचा कार्यक्रम सतत पाच दिवस सुरू होता यात विठ्ल मंदिरच्या स्त्रियांनी उत्सुर्त प्रतिसाद देत हा पाच दिवससिय योगाचा पूर्णपणे सहभाग दिला व प्रामुख्याने रोज सकाळी उपस्थित राहिल्या यावेळी कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली व नंतर योगाला सुरुवात केली यावेळी प्रामुख्याने आमदा किशोर भाऊ जोर्गेवार यांनी आपली उपस्थिती दर्शविली व सर्वांना या योगाबद्दल सांगितले की करो योग रहो निरोग हा मंत्र दिला या प्रसंगी यंग चांदा ब्रिगेड च्या वतीने सौ. विमलताई काटकर यांनी शाल श्रीफळ देऊन श्री मसराम सर यांचा सत्कार केला.
योग शिबिराचे यशस्वीपणे आयोजन करण्यासाठी यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्या सौ.विमलताई काटकर ,श्री काटकर सर , सौ.आरती आगलावे , सौ.स्मिता वैद्य , आशू फुलझेले , जास्मिन शेख तसेच महिला पतंजली योग समितीच्या वतीने योग शिक्षिका सौ. अल्काताई जिझीलवार व सौ.अश्विनी रामेडवार यांचे बहूमुल्य सहकार्य लाभले .



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!