शासकिय वैद्यकिय महाविद्यालय तथा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथिल कंत्राटी कामगारांच्या वेतन देण्यात यावे यासाठी अनिल देशमुख, गृहमंत्री, महाराष्ट्र यांना दिले निवेदन
जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )
चंद्रपूर : - आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय मजदुर परिषद चंद्रपूर जिल्हा तर्फे शासकिय वैद्यकिय महाविद्यालय तथा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथिल कंत्राटी कामगारांना वेतन देण्यात यावे. चंद्रपूर शासकिय वैद्यकिय महाविद्यालय तथा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे बरेचशे कर्मचारी यांचे कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या कामगारांचे माहे ०१/०८/२०२० पासून चे वेतन प्रलंबित आहे. वारंवार मागणी करुनही ते वेतन अदा करण्यात आलेले नाही. तसेच या कामगारांना अजून पर्यंत किमान वेतन कायद्याच्या तरतुदी तसेच कामगार कायद्याचे इतर कोणत्याही तरतुदीचे पालन करण्यात आलेले नाही. यासंबधीय संघटनेच्या माध्यमातून बरेचदा पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे. परंतू त्याची दखल अधिष्ठाता शासकिय वैद्यकिय महाविद्यालय, चंद्रपूर यांनी घेतलेली नसल्यामुळे मोठ्याप्रमाणात असंतोष निर्माण झालेला आहे.
विशेष म्हणजे बरेचदा कामगार असे आहेत कि, त्या कामगारांचे फेब्रुवारी २०२० पासूनचे अजूनही एकही पगार देण्यात आलेला नाही. कोविड सारख्या महामारीच्या काळात देखिल या कामगारांनी आपली सेवा पुर्णपणे ईमानदारीने केली आहे. परंतू त्यांच्याकडे पुर्णपणे दुर्लक्ष करण्यात आलेले आहे त्यामुळे कामगारांवर उपासमारीची पाळी उद्भवलेली आहे. कामगारांनी उदरनिर्वाह कसा करावा हि मोठी समस्या निर्माण झालेली आहे. असे असतांना देखिल काही कामगारांची हेतुपरस्पर वारंवार बदली करून मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे. पुर्ण दिवस काम करुन देखिल कोणतेहि कारण नसतांना पगारात कपात केली जात आहे. एकाच श्रेणीच्या कामगारांना सारखेच दिवस काम करुन देखील पगार करताना पगारात मोठ्या प्रमाणात तफावत आहे.तेव्हा आपणास विनंती आहे कि, कामगारांचे प्रलबिंत असलेले सर्वच वेतन ताबडतोब अदा करण्याबाबत अधिष्ठाता शासकिय वैद्यकिय महाविद्यालय चंद्रपूर यांना निर्देश द्यावेत व आपण केलेल्या कार्यवाहिची माहिती ताबडतोब संघटनेत देण्याची कृपा करावी हि नम्र विनंती. यावेळेस उपस्थित राष्ट्रीय बजरंग दल विदर्भ प्रांत चंद्रपूर विभाग अध्यक्ष नंदू गट्टूवार आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष शंकर सदार अरोरा राष्ट्रीय महिला परिषद चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष सुशीला ताई मले ओजस्विनी कार्याध्यक्ष दिव्या एडला राष्ट्रीय बजरंग दल चंद्रपूर शहर संपर्क प्रमुख अंशुल कामनवार राष्ट्रीय मजदूर परिषद चंद्रपूर जिल्हा महामंत्री रमेश मले इत्यादी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!