शालेय स्पर्धेत नवभारत कन्या विद्यालयाची चमकदार कामगिरी



मूल (प्रतिनिधी)
टाटा बिल्डिंग इंडिया चे वतीने घेण्यात आलेल्या विविध शालेय स्पर्धेत नवभारत कन्या विद्यालय च्या विद्यार्थिनींनी भरघोस यश संपादन केले. यशस्वी विद्यार्थिनींना आज सुवर्णपदक कास्यपदक आणि रौप्य पदक व प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आले.
या स्पर्धेत मिडल स्कूल मधून विद्यालयाच्या कुमारी आचल बुरांडे प्रथम, प्राची पंधरे द्वितीय तर सायली बोधलवार तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली. हायस्कूल विभागातून पलक फलके ही प्रथम, संतवाणी संदावार, द्वितीय तर सुजाता भडके तृतीय पुरस्काराचे मानकरी ठरली.
विजेत्यांना नवभारत कन्या विद्यालय मुलच्या मुख्याध्यापिका सौ. शुभांगिनी वैरागडे यांचे हस्ते प्रशस्ती पत्रासह सुवर्णपदक रौप्य पदक आणि कास्य पदक देऊन गौरविण्यात आले.
विद्यार्थिनी मेहनत घेतल्यास यश नक्कीच मिळतो असे गौरवोद्गार याप्रसंगी वैरागडे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन शिक्षक गुरुदास चौधरी यांनी तर आभार प्रदर्शन अशोक येरमे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!