देशाची कृषी अर्थव्यवस्था ठराविक उद्योगपतींच्या ताब्यात देण्याचे सरकारचे षडयंत्र - किशोर ढमाले

राजुरा - प्रतिनिधी ( रोशन येवले )

राजुरा : - दिल्ली (  टिकरी बॉर्डर ) महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागातील सुपिक कृषी जमीन व पाण्यावर अदानी-अंबानी सारख्या खाजगी उद्योगपतींची नजर असून कृषी कायद्याच्या माध्यमाद्वारे मालक असलेल्या शेतकऱ्यांना कंत्राटी मजूर करण्याचे व एकंदर कृषी अर्थव्यवस्था या ठरावीक उद्योगपतींच्या ताब्यात देण्याचे षडयंत्र सरकार रचत असल्याचा गंभीर आरोप विद्रोही विचारवंत तथा सत्यशोधक शेतकरी सभेचे मुख्य संयोजक किशोर ढमाले यांनी केला आहे. 
         केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधात जून महिन्यापासून सातत्याने आंदोलन करीत असलेल्या सत्यशोधक शेतकरी सभा व सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्यावतीने दिल्ली येथील शेतकरी आंदोलनात घेरा डालो डेरा डालो या किसान संघर्ष  जत्थ्याद्वारे १४ म शेतकर्यासह सहभाग घेण्यात आला आहे. येथील सिंधु,  टिकरी, शाजापूर येथील मुख्य मंचावरुन तमाम शेतकऱ्यांना संबोधित करताना किशोर ढमाले पुढे म्हणाले की, देशातील कोव्हीड आणीबाणीचा गैरफायदा घेत मोदी सरकारने कृषी व कामगार विरोधी काळे कायदे मंजूर करुन घेतले. परीणामी शेतकरी व कामगार बड्या कार्पोरेट कंपन्यांच्या मगरमिठीत अडकले आहेत. देशाची अर्थव्यवस्था आत्मनिर्भर करण्याची भ्रामक घोषणा करुन विदेशी वित्त भांडवलदारांना व अदानी - अंबानी सारख्या उद्योगपतींना कायदेशीर संरक्षण देण्याचा डाव मोदी सरकारने रचला आहे. या धोरणामुळे देशाचा विकास दर प्रचंड प्रमाणात खाली आला तर मुकेश अंबानींच्या मालमत्तेचे मूल्य ४.८ लाख कोटी रुपयांवरुन ६.५ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. देशाचा विकास घडवून आणण्याची क्षमता केवळ कृषी अर्थव्यवस्थेत असल्याने त्यांना प्रोत्साहन देण्याऐवजी ही संपूर्ण व्यवस्थाच खाजगी उद्योगपतींच्या ताब्यात देण्याचे षडयंत्र सरकार रचत आहे. संपूर्ण देशातील शेतकरी सरकारच्या धोरणांमुळे बाधीत झाला असून दिल्ली येथे सुरु असलेले आंदोलन सरकारला जागे करण्यासाठी अतीशय संयमाने लढल्या जात आहे. मात्र सरकार जागे होत नसेल तर हा लढा आणखी तीव्र करण्यासाठी शेतकरी तयार आहेत, असे सांगून शेवटी विजय सत्याचाच होईल असा विश्वासही ढमाले यांनी यावेळी व्यक्त केला.प्रसगी श्रमिक शेतकरी परिषदेचे सचिव कॉ. सुभाषदादा काकुस्ते, सम्बन्धक शेतकरी सच्चे राष्ट्रीय  प्रवक्ते प्रशांत सोनोने,करणसींगदादा कोंकणी यांचीही  आक्रमक भाषणे झालीत,यावेळी सिनेइंडस्ट्री मील स्वराभास्कर, पंजाबी गायक हरभजन मान, जँझी B आर्या बाब्बर आदि मामलाक कलाकारांनी आक्रमकतेने सांस्कृतिक प्रतिरोध केला.विशेष म्हणजे विद्रोही सांस्कृतिक चळवळ सुध्दा महाराष्ट्रात सांस्कृतिक दहशतवादा विरूध्द अविरतपने संघर्षरत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!