तलोधी पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध दारूविक्री बंद करण्याकरिता तळोधी थानेदाराकडे पत्रकारांनी दिले निवेदन स्टेशन हद्दीतील अवैध धंदे सर्रास होणारी दारूविक्री बंद करण्याची मागणी



   तळोधी (बा)(यश कायरकर) 
   चंद्रपूर जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी असूनही तळोधी बाळापुर पोलीस स्टेशन हद्दीती मोठ्या प्रमाणात खुलेआम सुरू असलेल्या अवैध दारू विक्री , जुगार , मटका यांचेवर कुठलीही कार्यवाही होत नसल्याने व त्यामुळे अशांततेचे वातावरण निर्मिती होत असल्यामुळे, परिसरात कायदा व सुव्यवस्था टिकविण्याकरिता अवैध व्यवसाय करणाऱ्यावर दारू विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. असे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई , शाखा - तळोधी (बा.) यांच्यावतीने तळोधी (बा.) पोलीस स्टेशन ला आज निवेदन देण्यात आले.
      सविस्तर संपूर्ण जिल्हा दारूबंदी असूनही तळोधी बाळापुर पोलीस स्टेशन हद्दीतील तळोधी , वाढोणा , गिरगाव , गोविंदपूर ,  येथे गावाबाहेर सर्रास दुकान लावून दारूविक्री केली जात आहे. मात्र याकडे तळोधी बालापुर पोलीस किंचीतही लक्ष देऊन कुठलीही कारवाई करीत नसल्याने यांचेच आशिर्वादाने ही गावाबाहेर दारुची दुकाने थाटली गेली आहे काय ? असे संशय  लोकांच्या मनात निर्माण झालेले आहे. व वेगवेगळ्या चर्चेला परिसरात आले आहे . त्यामुळे स्वतःहून कारवाई करीत नसल्याचे लक्षात आल्याने पुढाकार घेऊन स्वतः 'महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई, शाखा- तळोधी (बा.) च्या वतीने तळोधी पोलिसांना निवेदन देण्यात आले. तरीही पोलिसांनी या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य चौकशीनंतर  योग्य ती कारवाई करून हे अवैध धंदे बंद करावे व परिसर दारू मुक्त करावे . असे मागणी या निवेदनामध्ये पत्रकार संघातर्फे करण्यात आलेली आहे. सदर निवेदन देताना पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय अगडे , सचिव मोनील देशमुख , भारत भाऊ चुनारकर , यशवंत कायरकर , महेश काशीवार , अजय भागवतवार , दिवाकर कांबळी , सुभाष गजबे,  अरुण बारसागडे हे  पत्रकार उपस्थित होते. तर तळोधी पोलीस स्टेशन तर्फे पीएसआय श्री साखरे यांनी हे निवेदन स्वीकारले.
      ठाणेदार श्री खैरकर यांनी याबाबत  बोलताना लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकार यांच्या निवेदनातील मागणीकडे लक्ष देऊ परिसर दारूमुक्ती करण्याचा आश्वासन त्यांनी यावेळी दिला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!