मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या भंडारा व चंद्रपूर जिल्हा दौऱ्यावर

 भंडारा जिल्हा - प्रतिनिधी ( प्रकाश नाकतोडे )

भंडारा : - दि.07/01/2021 मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हे उद्या शुक्रवार दि. 8 जानेवारीला भंडारा जिल्हयाच्या  दौ-यावर येत असून, यात ते भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांना भेटी देणार आहेत.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे हे उद्या सकाळी 10.15 वाजता नागपूर विमानतळावर विशेष विमानाने येणार आहेत. त्यानंतर हेलिकाँप्टरने गोसेखुर्द (जि. भंडारा)कडे प्रयाण करतील. सकाळी 11.00 वाजता गोसेखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्प येथे त्यांचे आगमन होईल. त्यानंतर सकाळी 11.45 वाजता पवनी तालुक्यातील राजीव टेकडी येथे आगमन होईल व वेळ राखीव असेल.  दुपारी 1.15 वाजता ब्रह्मपुरी तालुक्यातील खेडमटकाकडे रवाना होतील. दुपारी 1.30 वाजता शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, ब्रह्मपुरी येथे आगमन होईल. त्यानंतर दुपारी 2 वाजता घोडाझरी येथे सांडकालव्याची पाहणी करण्यासाठी निघतील. त्यानंतर कालव्याची पाहणी करून 2.30 वाजेच्या सुमारास शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, ब्रह्मपुरी येथे आगमन व तेथून नागपूर विमानतळाकडे हेलिकॉप्टरने प्रयाण करतील. दुपारी  साधारणत: 3.15 वाजता नागपूर येथून मुंबईकडे रवाना होतील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!