बल्लारपुरातील पत्रकार दिन साजरा
बल्लारपूर(धनंजय पांढरे)
लोकशाही व्यवस्थेचा चवथा स्तभं म्हणून पत्रकार ओळखला जातो निष्पक्ष व निर्भीड पत्रकारिता करून समाजातील शोषित, पीडित वंचीत समाजाला न्याय मिळवून देण्याचे कार्य पत्रकार करीत असतो आज 6 जानेवारी मराठी पत्रकारितेचे जनक म्हणून ओळखले जाणारे दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती पत्रकार दिन म्हणून साजरी करण्यात येते या अनुषणगाने बल्लारपूर शहरात विविध पत्रकार संघटनांनी लोकोपयोगी उपक्रम राबवून पत्रकार दिन साजरा केला.
महाराष्ट्र पत्रकार संघ तालुका शाखा बल्लारपूर च्या वतीने बल्लारपूर येथील मातोश्री वृद्धाश्रमात पत्रकार दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला यावेळी विचारपीठावर मा.शोभाताई फडणवीस माजी आमदार, चंद्रपूर(मूल-सावली), मा. डॉ. रजनीताई हजारे ज्येष्ठ काँग्रेस नेत्या बल्लारपूर, पद्माकरजी पांढरे, पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष रमेश निषाद ई ची उपस्थिती होती यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्या बद्दल मान्यवरांचा सत्कार करण्यात आला बल्लारपूर शहरातील ज्येष्ठ पत्रकार म्हणून मंगल जिवणे यांचा सत्कार तर ज्येष्ठ व नामांकित पत्रकार वसंत खेडेकर, पद्माकर पांढरे यांचा पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच मातोश्री वृद्धाश्रम येथील वृद्धांना पत्रकार संघाच्या वतीने ब्लँकेटचे वितरण करण्यात आले यावेळी मा.शोभाताई फडणवीस यांनी विचार व्यक्त करतांना पत्रकारांनी निष्पक्ष व निर्भीड पत्रकारिता करतांना समाजातील वंचीत, शोषित, पीडित घटकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा तसेच कुटुंबीयांनी दुरावलेल्या निराश्रित व्यक्तींना आधार देण्याचा प्रयत्न करावा व आपल्या जीवनातील प्रत्येक सुख व दुःखाचे क्षण या निराश्रित व्यक्तीसोबत साजरे करावे असे आवाहन करण्यात आले यावेळी महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने मा.शोभाताई फडणवीस, मा.रजनीताई हजारे यांच्या हस्ते कला गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
तसेच सुधीरभाऊ फॅन्स क्लब बल्लारपूर च्या वतीने ज्येष्ठ पत्रकार वसंत खेडेकर, पद्माकर पांढरे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाला मान्यवर म्हणून नगरसेवक श्री अरुण वाघमारे, श्री स्वामी रायबरम, श्री अजय दुबे यांची उपस्थिती होती तर या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाराष्ट्र पत्रकार संघाचे सदस्ययांचे परिश्रम लाभले



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!