हा तर पालक मंत्र्यांना बदनाम करण्याचा डाव - केवल सिंग जुनी शिवसेना उप तालुका प्रमुख

जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )

चंद्रपूर : - स्वतःविषयी गुन्हे लपवून,पासपोर्ट विभागाची दिशाभूल केल्याचा ठपका पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांचेवर लावण्यात आला.व पासपोर्ट जप्त करण्यात आले.असा प्रचार करणे,हा निव्वळ महाविकास आघाडीतील क्रियाशील चंद्रपूर जिल्ह्याच्या पालकमंत्र्याला बदनाम करण्याचा डाव असल्याचे शिवसेना चिमूर उपतालुका प्रमुख केवलसिंग जुनी यांनी मत व्यक्त केले.

      ना.विजय वडेट्टीवार हे जिल्ह्याचे पालक मंत्री बनल्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचा सर्वांगीण विकास सुरु आहे.जिल्ह्यातील विरोधी पक्षाच्या आमदारांना पुढे करून महविकास आघाडीला बदनाम करण्याचा निरंत्तर डाव रचून प्रतिमा मलीन करणे सुरू आहे.वरिष्ठ स्वतावर गंभीर गुन्हे दाखल होण्याची लज्जा नसलेले काही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, काम करणाऱ्या पालक मंत्र्याची नाहक बदनामी करीत असल्याने याचा संताप शिवसेना उपतालुका प्रमुख केवलसींग जुनी यांनी व्यक्त केला आहे. लोकप्रिय युवा नेते हे स्वत: गंभीर गुन्ह्यातील आरोपी असून लोकप्रतिनिधी दुसऱ्यांना बदनाम करतात हा तर त्यांचा बालीशपणाच समजावा, असेही त्यांचे मत आहे.यावर संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!