दारू पुरवठा करणाऱ्या दारू माफीया A.N. व दारू तस्कर B.P. यांच्यावर कार्यवाही करणार तरी कोण ?

तालूका - प्रतिनिधी (केवलसिंग जुनी)

चिमूर : - चिमुर तालुक्यामध्ये दारूचा खुलेआम पणे व्यवसाय सुरू असल्याचे दिसुन येत आहे.दारू माफीया A.N. (हिंगणघाट) यांचा चिमुर तालूकाच नव्हे तर मुल,नवरगाव  सिंदेवाही,नागभिड, पर्यंत बिनधास्त पणे दारू पुरवठा मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची चर्चा चिमुर तालूक्यात होत आहे.या दारू माफियाला मंत्र्याने  व मोठ्या अधिकारी यांनी काम दिला आहे अशा प्रकारची दारू विक्रेत्या कडून सर्रासपणे चर्चा जोरदार सुरु आहे.तर मग यांच्यावर कार्यवाही करणार तरी कोण ? हा मोठा प्रश्न जनतेत पडला आहे.या दारू माफीयाला जिल्ह्यावरूनच दारू पुरवठ्याचा काम देण्यात आला आहे अशी शुध्दा चर्चा दारू विकणाऱ्या विक्रेत्या कडून होत आहे.म्हणूनच बिनधास्त पणे या दारू माफीयाचा पुरवठा घर पोच होत आहे.
छोट्या दारू विक्रेतेला स्थानिक पोलीसानी सुचणा देण्यात आल्या कि तुम्ही फक्त A.N कडूनच दारू घेण्यात यावे अश्या प्रकारच्या सुचना देण्यात आल्या आहेत.अश्या प्रकारच्या जर सुचना मिळत असेल तर या दारू माफीया ची दारू कोण पकडणार हा मोठा प्रश्न आहे. व सागण्यात आले आहे कि तुम्ही बिन धास्त पणे धंदा करा.जर कोणी तुमची दारू पकडली तर मला फोन करा.मि बगुन घेतो ते मग एल.सी.बी. असो की स्थानिक पोलीस यांना मी बगतो.दोन दिवसा अगोदर पुन्हा एल.सी.बी.बरोबर बैठक झाल्याची चर्चा होत आहे.काही अटी वर स्थानिक दारू विक्रेता हे जोरात दारू चा धंदा करीत आहे.माझ्या क्षेत्रात  फक्त माझीच दारू चालेल अशी सुचना देण्यात आली आहे.म्हणूनच कोणीही यांची दारु पकडण्या ची हीम्मत करीत नाही. या परीसरातुन  दारूच्या दरोज १२ ते १५ गाडी या परीसरात जात असल्याची चर्चा होत आहे.जर दुसऱ्यानी लपुन छूपून एकही आनली तर लगेच त्यांची दारू पकडण्यात येत आहे.या दारू माफीयाच्या गाड्या येवड्या वेगाने येत असतात कि कधी ही मोठा अपघात होऊ शकतो.या अगोदर शुध्दा दोन-तीन वेळा या दारू माफीया गाड्याचे या परीसरात अपघात झाले आहेत.
       तर दुसरी कडे दारू तस्कर B.P. (मोटेगाव) यांची शुध्दा नेरी परीसरात मोठ्या प्रमाणात दारू पुरवठा करीत असल्याची चर्चा नेरी परीसरात होत आहे.या दोघाना काही दिवसा अगोदर भिसी पोलीस स्टेशन अंर्तगत अटक करण्यात आली होती.वरूनच पुर्ण पने सेटींग झाल्याची चर्चा होत आहे.दारूबंदी पथक चंद्रपुर यांनी शुध्दा हात वर केल्याचे समजले जात आहे.तर स्थानिक पोलीस स्टेशन चा पुर्ण पणे आशिर्वाद असल्याचे समजते म्हणूनच पुरवठा करनाऱ्यांना सहकार्य मोठ्या प्रमाणात मिळत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!