संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त वरूर रोड येथील युवकांनी केली स्वच्छ्ता अभियान

संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त वरूर रोड येथील युवकांनी केली स्वच्छ्ता अभियान

राजुरा:( रोशन येवले) 
थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त जगतगुरू तुकोबाराय सार्वजनिक वाचनालय वरूर रोड येथे स्वच्छ्ता अभियान राबविण्यात आले. गेल्या दोन वर्षांपासून वरूर् रोड येथील वाचनालयातील युवक   महामानवाच्या जयंती पुण्यतिथी निमित्त विविध उपक्रम, लहान विद्यार्थ्यासाठी स्पर्धेचे आयोजन, कार्यक्रम राबवित असते. दरवर्षी प्रमाणे यंदाही संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त युवकांनी आपल्या हातात झाडू घेऊन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील संपूर्ण परिसर स्वच्छ केला.आणि गोळा केलेला सर्व प्लास्टिक, केरकचरा ग्रामपंचायत कार्यालय वरूर् रोड यांच्याकडे सुपूर्त केले. संत गाडगे बाबा म्हणतात की, देव माणूस आणि संत माणूस होऊन जगण्यापेक्षा माणूस म्हणूनच मानवतेची आयुष्यभर सेवा करा. त्यांनी आपल्या कीर्तनातून समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, गरिबी,कुपोषण, शोषण , लुबाडणूक या विरुद्धच्या बुरसटलेल्या व्यवस्थेवर अक्षरशः असूड ओढलेत. या उपक्रमात प्रवीण चौधरी, प्रज्वल बोरकर, गौरव हिवरे, साहिल मडावी, करण उरकुडे, राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे विशाल शेंडे या युवकांनी स्वच्छ्ता अभियान राबवून गावकऱ्यांना स्वच्छतेचा मंत्र पटवून दिला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!