दिवसा पोलीस मित्र व पत्रकार तर रात्रो ला दारू पुरवठा ठेकेदार
तालूका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )
चिमूर : - चिमुर तालूक्यातील जांभुळघाट येथील काही व्यक्ती कित्येक दिवसापासुन पोलीस मित्र व पत्रकाराच्या नावाने अवैध धंदेवाईकाकडून लुटमार करण्याचे काम काही व्यक्ती करीत आहे.पोलीस आले कि पोलीसा बरोबर फिरतात आणि नंतर दारू माफीयांना रात्रो व दिवसा ला पुर्ण सहकार्य करतात.आता तर जांभुळघाट रस्त्याने दिवसातुन बऱ्याच दारूच्या गाड्या जात असतात त्या पास करण्याचे काम हे व्यक्ती करीत असतात. दारू,सट्टा तसेच प्रेमी जोडपे यांना धमकाऊन पैसे वसुली करीत असतात.तर कधी पोलीस मित्र,पत्रकार तर कधी पोलीस या नावाने यांचे कित्येक व्यवसाय दिवसा पासुन सुरू असुन सुध्दा या कडे पोलीस दुर्लक्ष करीत आहे.अवैध व्यावसायिक यांचे कडून वसुली करण्याचे काम शुध्दा हे व्यक्ती करीत असतात.या अगोदर यांच्या विरोधात लेखी व तोंडी पोलीस प्रशासना कडे तक्रार दिली होती.प्रेमी जोडप्याकडून या व्यक्ती ची तक्रार करण्यात आली होती.आता या व्यक्तीची दिवसें दिवस हिम्मत वाढतच चाललेली आहे.पोलीस प्रशासनाने अशा तुतीया कडे लक्ष देऊन अश्या व्यक्ती वर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी जांभुळघाट परीसरात होत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!