ब्रम्हपुरी कृषी उत्पन्न बाजार समिती कडून; धान उत्पादक शेतकऱ्यांची पिळवणूक.

ब्रम्हपुरी कृषी उत्पन्न बाजार समिती कडून; धान
उत्पादक शेतकऱ्यांची पिळवणूक.

ब्रह्मपुरी प्रतिनिधी 
नुकताच केंद्र शासनाने कृषी विषयक कायदा केला मात्र हा केलेला कायदा शेतकऱ्यांचे हित जोपासणारे नसल्यामुळे राजस्थानच्या धान उत्पादक शेतकऱ्यांनी केंद्र शासनाच्या विरोधात दिल्लीत जनआंदोलन करून रस्ता रोको आंदोलन करावे लागत असून दुसरीकडे बाजार समितीकडून शेतकऱ्यांची पिळवणूक होत नसल्याचे दिसून येत आहे.
ब्रह्मपुरी तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या जाण्याचा काटा जलदगतीने व्हावे म्हणून बाजार समितीकडे सातबारा जमा केला मात्र बाजार समितीने सात-बारा दिलेल्या दिवशी सातबारा ची नोंद केली नाही व ते बांधून ठेवले. मात्र सातबारा बांधलेल्या गटयातून अनेकांचे सातबारा गहाळ झाले असून बाजार समितीशी हितसंबंध असणाऱ्यांचे नंबर लागल्याचे असल्याचे निदर्शनास आले. सातबारा देऊन आठ ते दहा दिवसापासून वारंवार काम धंदे रोजीरोटी सोडून शेतकरी बाजार समिती चकरा मारत आहेत सातबारा अस्ताव्यस्त पडले असल्याने आपल्याला टोकण कधी मिळेल व आपल्या धानाचा काटा केव्हा होईल या आशेने धान उत्पादक शेतकरी प्रमुख बाजार समिती प्रशासनावर रोष व्यक्त करीत असून शेतकऱ्यांनी सातबारा दिलेल्या दिवसापासून नोंद करून ती फलकावर लावावी व या कामात पारदर्शकता असावी अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. तालुक्यात धान उत्पादक शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात असून आपले 
धानास योग्य शासकीय भाव मिळावा यासाठी धान विक्रीकरिता फेडरेशन मध्ये देण्यासाठी प्रयत्नात असतात. शेतकऱ्यांना फेडरेशन मधे  नंबर लावण्यासाठी सर्वप्रथम कृषी उत्पन्न बाजार समितीतून टोकन घ्यावे लागते तया टोकून नुसारच ठरलेल्या ठिकाणी शेतकरी आपले धान्य विकण्यासाठी नेतात. शेतकरी आपला सातबारा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जमा करून त्यावर प्रशासनाकडून ्या सातबार्‍यावर टोकण  नंबर देऊन आपणास मोबाईल वर कळविण्यात येत असे कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाकडून शेतकऱ्यांना सांगण्यात आले.
मात्र प्रत्यक्षात कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी आपला टोकन क्रमांक किती आहे हे विचारण्यासाठी आले असता सातबार्यावर ठोकून लिहिलेले फॉर्म कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात अस्ताव्यस्त पडले असल्याचे निदर्शनास आले शेतकऱ्यांची झुंबड झुंबड आपला फार्म शोधण्यासाठी गर्दी करून बसले होते एकंदरीत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!