तळ ठोकून बसलेल्या वनविभागाला मिळाले यश
तळ ठोकून बसलेल्या वनविभागाला मिळाले
सिंदेवाही :( शांताराम आदे)
उपवन परिक्षेत्र नवरगाव,बीट रत्नापूर अंतर्गत असलेल्या गट नंबर 44 मधून वडसिकडे निघणाऱ्या मार्गाने पिपर्डा येथील काही ताटव्याचे ठेकेदार नेरी येथील ठेकेदाराला माल पोहचवित असल्याचे वनविभागाला गुप्त माहिती मिळाली असल्याने वन विभागाचे कर्मचारी तीन दिवसापासून तळ ठोकून बसले होते, दि.१९/१२/२०२०रोज रविवारला रात्रौ ९:३०वाजताच्या सुमारास ट्र्याकटरचा पाठलाग करून सरांडी येथील मामा तलावाजवळ क्षेत्र सहाय्यक श्री बुल्ले,वनरक्षक वैद्य, सहारे आणि त्यांची टीम त्यांना पकडून ट्र्यकटर नवरगाव नाक्यात जमा करण्यात आली,पकडलेल्या मालाची व गाडीची किंमत ८,२४,८००रुपये असल्याचे वनविभागाने सांगितले आहे, व गाडी मालकावर गुन्हा नोंदविण्यात आला.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!