घरामध्ये ठेवलेल्या देशी विदेशी दारूवर वरोरा पोलिसांची मोठी कारवाई

तालुका - प्रतिनिधी (आलेख रट्टे)

वरोरा : - पो.स्टे वरोरा हद्दीतील अवैद्य दारू विक्रेता पिंटू उर्फ अनिलसिंग अदबसिंग जुनी रा. टिळक वार्ड वरोरा याने देशी व विदेशी दारूचा माल आणून आपले राहते घराच्या बाजूला असलेल्या  सोमनाथ पवार यांचे घरात साठा करून ठेवलेला असल्याचे माहिती पडल्याने  पोलीस रेड केली असता आरोपी पिंटू उर्फ अनिलसिंग जुनी  हा पोलिसांना पाहून पळून गेला तेव्हा मिळालेल्या माहितीप्रमाणे घर झडती घेतली असता  रॉकेट देशी दारूच्या एकूण 53 पेट्या (5300 निपा ) , विदेशी दारूच्या 11 पेट्या (528 निपा ) , विदेशी दारूचे बंपर 1 पेटी (12 बंपर), बिअर 3 पेट्या ( 72 बाटल्या) , बिअर बंपर 1 पेटी (12 बाटल्या) च्या एकूण दारू कि.8,38,000 रु आठ लाख अळतीस हजार चा मुद्देमाल मिळून आला. यातील आरोपीचा शोध घेतला असता पिंटू उर्फ अनिलसिंग जुनी पोलिसांना पाहून फरार झाल्याने आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.सदरची कारवाही पोलीस अधीक्षक अरविंद साळवे ,  अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे , डॉ.निलेश पांडे ,उप विभागीय पोलीस अधिकारी वरोरा यांचे मार्गदर्शनात  पोलीस निरीक्षक दिपक खोब्रागडे पो.स्टे. वरोरा  यांचे मार्गदर्शनात पी.एस.आय सर्वेश बेलसरे, सफो विलास बलकी, ना.पो.शी. किशोर बोढे, पो.शी.विशाल गिमेकर, पोशी  कपिल भंडारवार , पोशी सुरज मेश्राम,  पो.शी. दिनेश मेश्राम , पोशी महेश बोलगोडवार , मपोशी पल्लवी किनाके  यांनी पार पाडली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!