चिमूर येथे संपन्न झालेल्या लोकन्यायालयात अधिवक्ता व पक्षकार यांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद

अनेक प्रकरणांचा निपटारा

जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )

चंद्रपूर : - चिमूर येथील न्यायालयात दिनांक 12 डिसेंबर रोजी राष्ट्रिय लोकन्यायालय संपन्न झाले. या लोकन्यायालयात न्यायालयात दाखल असलेल्या एकूण फौजदारी प्रकरणांपैकी 69 प्रकरणे ठेवण्यात आली व त्यापैकी 11 प्रकरणे आपसी समझोत्याने निकाली निघुन समझोता रक्कम रू.7,90,549/- वसुल
झाली. तसेच एकूण दिवाणी प्रकरणांपैकी 32 प्रकरणे ठेवण्यात आली व त्यापैकी 5 प्रकरणे निकाली निघाली. बॅक व मराविवि कंपणीचे दाखलपुर्व प्रकरणे ठेवण्यात आली त्यामध्ये रक्कम रू.50,000/- वसुल झाले. तसेच विविध ग्राम पंचायतीचे घर टॅक्स व पाणीपट्टी कर वसुलीची 143 दाखलपुर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती त्यापैकी 42 प्रकरणे निकाली निघाली असुन रक्कम रू.3,78.180/- वसुल झाले. स्पेशन ड्राईव्ह मध्ये एकूण 48 केसेसचा निपटारा लागला असुन दंड रू.19,500/- वसुल झाला.

सदरचे लोकन्यायालया करीता पॅनल प्रमुख म्हणुन श्री. आर.एम.भेंडे, दिवाणी न्यायाधीश चिमूर तसेच अॅड. श्री आर. आर. सोनडवले व सामाजीक कार्यकर्ता श्री सुभाष शेषकर यांनी काम पाहिले या लोकन्यायालयात सहभागी सर्व अधिवक्ता, पक्षकार तसेच न्यायालयीन सर्व कर्मचारी तसेच पोलीस विभागाचे कर्मचा-यांनी मोलाचे सहकार्य केल्याबद्यल तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष श्री आर. एम. भेंडे यांनी सगळयांचे अभिनंदन केले असुन आभार मानले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!