माळी समाज आपली स्वतंत्र जनगणना करणार
माळी समाज आपली स्वतंत्र जनगणना करणार
ब्रम्हपुरी (प्रतिनिधी)
अखिल भारतीय माळी महासंघ ब्रम्हपुरी तालुक्याचे वतीने माळी समाजाची स्वतंत्र जनगणना करण्यात येणार असल्याचे ब्रम्हपुरी तालुका अध्यक्ष सुधाकर महाडोरे यानी प्रसिद्धी माध्यमांना कळविले आहे
सविस्तर असे कि, ओबीसीची जातीनिहाय जनगणना करावी याकरिता ओबीसी समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहे मात्र सरकार याची गंभीरता समजुन घेत नसल्याने यामधीलच एक घटक असलेला माळी समाज मात्र आपली स्वतंत्र जनगणना करणार आहे.
याबाबत अखिल भारतीय माळी महासंघ तालुका ब्रम्हपुरी ची कार्यकारी मंडळाची बैठक ब्रम्हपुरी येथे काल पार पाडली त्यात हा निर्णय घेण्यात आला ब्रम्हपुरी शहरात याची सुरुवात पण झाली आहे. ग्रामीण भागात जनगणना करण्यासाठीचे नियोजन करण्यात आले असुन त्याकरिता माळी समाज जनगणना समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यात प्रामुख्याने सुधाकर महाडोरे, प्रा. नामदेवराव जेन्गठे, से.नि.प्राचार्य अरुण शेंडे, अशोक शेंडे सर, प्रा. राहुल मोहुर्ले, प्रभाकर नागरिकर, प्रा. पंकज बेन्देवार, भस्कर लेनगुरे, प्रकाश लांजेवार, प्रशांत वसाके, प्रा. राजु आदे, रमेश महाडोरे, मनोहर पेटकुले, आर.एच. देशकर यांचा समावेश करण्यात आला आहे.
अखिल भारतीय माळी महासंघ ब्रम्हपुरी तालुका महिला आघाडी चि स्वतंत्र संघटना तयार करण्यात येणार असून त्यान्चे कडे सुद्धा माळी समाज जनगणनेची जबाबदारी देण्यात येणार आहे.
याकरिता ब्रम्हपुरी तालुक्या मध्ये 8 विभाग करण्यात आले असुन त्यामधे मेंडकी, जुगनाळा, आवळगाव, मुळझा, खेड, दिघोरी, अड्याळ, चीचगाव, पिंपळगाव या विभागाचा समावेश आहे, ह्या गावांमध्ये बैठका घेण्यात येणार आहेत त्याकरिता दिनांक 8 डिसेंबर ते 20 डिसेंबर असा दौरा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे त्यामुळे त्या गावा लगत असलेल्या गावातील माळी समाज बांधवांनी त्याठिकाणी उपस्थित राहण्याचे आव्हान माळी समाज जनगणना समन्वय समितीनेकेले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!