नांदेड ईटान शेत शिवारातुन ३५ ते ४० ब्रास मोठा रेती साठा जप्त

लाखांदुर तहसीलदारांची सगळ्यात मोठी कार्यवाही

लाखांदुर तहसीलदारांचे अवैद्ये रेती साठ्यांवर धाढ  सत्र सुरु

रेती तस्करांचे दनानले धाबे

भंडारा जिल्हा - प्रतिनिधी ( प्रकाश नाकतोडे )

भंडारा : - लाखांदुर तालुक्यातील अगदी शेवटच्या टोकाला असलेलेले नांदेड ,ईटान गावे आहेत याच गावाच्या बाजुने वैनगंगा नदी वाहाते याच वैनगंगा नदी पात्रातुन रात्रभर रेतीचा जेसीबीच्या साह्याने अवैद्ये उपसा करुन शेतशिवारा मध्ये साठवणुक करुन मोठ्या ट्रकच्या साह्याने आंतर जिल्ह्यात रेसतीवाहतुक केल्या जाते हे रेती चोरीचे सत्र तीन मते चार महिण्या पासुन सुरु आहे.मात्र या कडे महसुल विभागाच्या अधिकार्यांनी बग्याची भुमिका घेऊन बुरखा पाघरुन रेती तस्करांसोबत हात मिळवनी केली असल्यामुळे कार्यवाही केलेली नाही मात्र अगदी एका महिण्या अगोदर रुजु झालेले तहसिलदार  निवृत्तीजी ऊईके साहेब यांनी अवैद्ये रेती उपसा व वाहतुकीवर आळा घालण्यासाठी धाड सत्र सुरु केले असुन शासनाला महसुल मिळवुन देण्यासाठी जनु विडा उचलला आहे. एका आठवड्यातील ही दुसरी कार्यवाही असल्यामुळे तहसिलदार साहेबांची तालुक्यात वाहवा होत असुन या वरुन पुर्णपने अवैध्ये रेती चोरीला आळा बसेल अशि अपेक्षा लाखांदुर तालुक्यातील जनतेनी केली असुन या धाड सत्रा मुळे रेती तस्करांचे धाबे दनानले आहेत.अंदाजे ३५ते४०ब्रास रेती जप्त केल्याची माहिती मिळाली आहे हि कार्यवाही करतांना मंडळ अधिकारी विरली( बु)नागपुरे उपस्तीत होते मंडळ अधिकारी नागपुरे यांच्याशी  पुर्ण माहीती जानुन घेण्या साठी फोनवर  संपर्क केला असता फोन उचलला नाही. लाखांदुर तालुक्यातील जनतेनी रेती साठवणुक दारांनवर व जमिन मालकावर कार्यवाहीची मागणी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!