चिमूर पोलीस स्टेशन च्या कर्मचारी वर्गणीतून दिली मृत शेळी मालकास आर्थिक मदत

चिमूर पोलीस स्टेशन चा सामाजिक उपक्रम 

जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )

चंद्रपूर : - चिमूर पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या चिमूर मासळ रस्त्यावर मागील महिन्यातील १ डिसेंबर २०२० ला चिमूर येथील एक गरीब शेतकरी शंकर तळवेकर यांच्या शेळ्या बसच्या धडकेने ११ शेळ्या मृत पावल्या होत्या. त्यांचे वर आर्थिक संकट कोसळले असल्याने याची दखल उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन बगाटे यांच्या संकल्पनेतून घेण्यात आले. 
माणुसकी दाखवीत सामाजिक उपक्रमाचा पुढाकार घेत चिमूर पोलीस स्टेशन कर्मचारी वर्गणी च्या माध्यमातून २१ हजार रुपयांची मदत निधी शंकर तळवेकर यांना देण्यात आली.
      मदतनिधी देत असतानाच्या छोट्याश्या कार्यक्रमात  पोलीस उपविभागीय अधिकारी बगाटे, पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश मोहोड पोलीस उपनिरीक्षक  कांता रेजिवाड  मॅडम आदी उपस्थित होते. 
   कायदेशीर रित्या एसटी महामंडळ कडून शंकर तळवेकर यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे आश्वासन उपविभागीय पोलीस अधिकारी बगाटे यांनी दिले.
 या कार्यक्रम दरम्यान सामाजिक सुधार फौंडेशन चे प्रदीप बंडे यांनी सुद्धा शंकर  तळवेकर यांना आर्थिक मदत दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!